Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE Board Exam 2027 Date: CBSE बोर्ड परीक्षेचं काउंटडाउन सुरू! दहावी-बारावीचे पेपर १६ फेब्रुवारीपासून सुरु

CBSE Board Exam 2027 Date: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, दोन्ही वर्गांच्या परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 20, 2026 | 12:30 PM
CBSE Board Exam 2027 Date: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

CBSE Board Exam 2027 Date: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • CBSE दहावी-बारावी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.
  • १६ फेब्रुवारी २०२७ पासून परीक्षा सुरू.
  • दहावीची परीक्षा ९ मार्च, तर बारावीची ९ एप्रिलला संपणार.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 2027 मध्ये होणाऱ्या SSC 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केले. CBSE ने 6 नोव्हेंबर 2026 ला आपल्या वेबसाईटवर वेळापत्रक टाकलंय. त्यानुसार 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा 16 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहेत. त्यामुळे आता अभ्यासाचं नियोजन करायला विद्यार्थ्यांना सोपं जाणार आहे. CBSE Board

10वी ची परीक्षा कधी संपणार?

CBSE च्या वेळापत्रकानुसार 10वीची परीक्षा 16 फेब्रुवारी ते 9 मार्च 2027 या दिवसात होईल. यावेळी 10वीच्या मुलांसाठी एकूण 83 विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक विषयाची तारीख वेगळी ठेवलीय. त्यामुळे तुमचा विषय कोणत्या दिवशी आहे, हे अधिकृत वेळापत्रकात जाऊन नक्की बघा.

UGC NET December 2026 Exam: UGC NET चं बिगुल वाजलं! डिसेंबर परीक्षेचं विषयानुसार वेळापत्रक जाहीर

12वी ची परीक्षा कधीपर्यंत चालणार?

12वीच्या मुलांची परीक्षा पण 16 फेब्रुवारी 2027 पासूनच सुरू होईल आणि 9 एप्रिलला शेवटचा पेपर असेल. 12वीसाठी एकूण 121 विषयांच्या परीक्षा होणार आहे. जर तुम्ही सायन्स, कॉमर्स का आर्ट्स, यानुसार आणि तुम्ही निवडलेल्या विषयानुसार तारखा तपासणं गरजेचं आहे. नाहीतर गोंधळ होईल.

परीक्षेची वेळ काय?

10वी आणि 12वीच्या सगळ्या परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरू होतील. केंद्रावर किती वाजता पोहोचायचं, कोणती कागदपत्रं न्यायची, सोबत काय नेता येईल, याची सगळी माहिती अॅडमिट कार्डवर दिली जाणार आहे. त्यामुळे अॅडमिट कार्डवरच्या सगळ्या सूचना नीट वाचून घ्या. आणि परीक्षेच्या दिवशी धावपळ नको म्हणून वेळेआधी केंद्रावर पोहोचा. उशीर झाला तर टेन्शन वाढतं.

प्रॅक्टिकल परीक्षा कधी?

नियमित शाळेतल्या मुलांच्या प्रॅक्टिकल परीक्षा आणि प्रोजेक्टचं काम 1 जानेवारी 2027 पासून सुरू होणार आहे. तर थंडी जास्त असलेल्या भागातल्या शाळांसाठी वेगळं नियोजन केलं होतं. त्या शाळांच्या प्रॅक्टिकल परीक्षा 9 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2026 या दिवसात झाल्या आहेत.त्यामुळे आता फक्त लेखी परीक्षेची तयारी करून चालणार नाही. प्रॅक्टिकल आणि अंतर्गत मार्कांचं पण शाळेकडून नीट माहिती घेऊन ठेवा. तुमचे शिक्षक सांगतील तसं प्रोजेक्ट पूर्ण करा.

Deepak Rajawat Air India Express: CFO ते थेट CEO! एअर इंडिया एक्सप्रेसच्या सर्वोच्च पदाची ‘या’ व्यक्तीकडे जबाबदारी

विद्यार्थ्यांनी काय करायचं?

  • आता वेळापत्रक हातात आलंय, त्यामुळे दिवस मोजत बसू नका. कोणता पेपर आधी आहे, कोणता नंतर, यानुसार अभ्यासाचं टाईम टेबल बनवा.
  • अवघड विषयाला जास्त वेळ द्या.
  • बोर्डाच्या परीक्षांचं विषयानुसार पूर्ण वेळापत्रक बघायचं असेल तर CBSE च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • तिथेच खरं वेळापत्रक मिळेल. अफवांवर विश्वास ठेवू नका.
  • आता फक्त 3 महिने उरलेत. रोज थोडा थोडा अभ्यास केला तरी पेपर सोपे जातील.
💡

Frequently Asked Questions

  • Que: CBSE दहावी आणि बारावीच्या परीक्षा २०२७ मध्ये कधी सुरू होणार आहेत?

    Ans: दोन्ही वर्गांच्या बोर्ड परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार आहेत.

  • Que: CBSE दहावीची परीक्षा कधी संपणार आहे?

    Ans: दहावीची बोर्ड परीक्षा ९ मार्च २०२७ रोजी संपणार आहे.

  • Que: CBSE बारावीची परीक्षा कधी संपणार आहे?

    Ans: बारावीची परीक्षा ९ एप्रिल २०२७ रोजी संपणार आहे.

Web Title: Cbse board exam 2027 class 10 12 date sheet rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • CBSE
  • CBSE Board Exam
  • CBSE Result

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.