Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Central Railway Apprentice : मध्य रेल्वेत बंपर भरती; कोणतीही परीक्षा नाही! १० वी आणि आयटीआय उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी

Central Railway Apprentice Recruitment 2026: मध्य रेल्वे भरती सेलतर्फे विविध ट्रेडमधील २,८६१ अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १० वी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार २ डिसेंबर २०२६ पर्यंत अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 04, 2026 | 12:56 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • मध्य रेल्वेत २,८६१ जागांवर मेगा भरती
  • १० वी आणि आयटीआय उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी
  • ‘या’ पदासाठी होणार भरती
Central Railway Apprentice Recruitment 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या आणि तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. रेल्वे भरती सेल, मध्य रेल्वे (RRC/CR) तर्फे अ‍ॅप्रेंटिस कायदा १९६१ अंतर्गत विविध कार्यशाळा आणि युनिट्समधील निरनिराळ्या ट्रेडसाठी तब्बल २,८६१ जागांवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता सुरू झाली असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांना २ डिसेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

‘या’ पदासाठी होणार भरती

या भरती प्रक्रियेत मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर या विविध क्लस्टरमधील वर्कशॉप्स व युनिट्समध्ये फिटर, वेल्डर, कारपेेंटर, इलेक्ट्रीशियन, मशिनिस्ट, पेंटर, स्टेनो अशा विविध ट्रेडसाठी प्रशिक्षणार्थी निवडले जाणार आहेत. अर्जासाठी शैक्षणिक पात्रतेचा विचार करता, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा (किंवा समकक्षी) उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (NTC) किंवा नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग / स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT/SCVT) चे तात्पुरते प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

IIT Kanpur MBBS Admission: आयआयटी कानपूर रचणार इतिहास! आता इंजिनिअरिंगच नव्हे तर MBBS चेही शिक्षण देणार

वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया

या पदांसाठी वयोमर्यादा ३ नोव्हेंबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण असावी आणि कमाल वयोमर्यादा २४ वर्षांपेक्षा जास्त नसावी, म्हणजेच उमेदवाराचा जन्म ०३/११/२००२ ते ०३/११/२०११ या कालावधीतील असावा. नियमानुसार एससी, एसटी उमेदवारांना ५ वर्षे, ओबीसी उमेदवारांना ३ वर्षे आणि अपंग व माजी सैनिकांसाठी उच्च वयोमर्यादेत विशेष सवलत दिली जाईल. उमेदवारांची निवड कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखतीशिवाय केली जाणार असून, १० वी मधील गुण (किमान ५०% गुण) आणि आयटीआय मधील ट्रेडच्या गुणांची साधी सरासरी काढून गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

Sainik School Admission 2027: सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची नोंदणी सुरू! ६ वी आणि ९ वीच्या प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सुरू

या भरतीसाठी अर्ज शुल्क १०० रुपये इतके असून, एससी, एसटी, अपंग आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. इच्छुक उमेदवारांनी RRC च्या अधिकृत [www.rrccr.com](https://www.rrccr.com) या संकेतस्थळावर जाऊन केवळ ऑनलाइन माध्यमातून अर्ज सादर करावा. मुदतीनंतर आलेले अर्ज किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मध्य रेल्वे अ‍ॅप्रेंटिस भरती २०२६ अंतर्गत एकूण किती जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत?

    Ans: या भरती मोहिमेद्वारे एकूण २,८६१ अ‍ॅप्रेंटिस पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

  • Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

    Ans: इच्छुक उमेदवारांना २ डिसेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.

  • Que: शैक्षणिक पात्रता काय असावी?

    Ans: उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI (NTC/SCVT प्रमाणपत्र) पास असणे आवश्यक आहे.

Web Title: Central railway apprentice recruitment 2026 2861 posts sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • centrail railway
  • Contract Basis Job
  • Job

संबंधित बातम्या

RITES Recruitment 2026: रेल्वे मंत्रालयांतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘राईट्स’मध्ये ‘या’ पदांसाठी भरती जाहीर
1

RITES Recruitment 2026: रेल्वे मंत्रालयांतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘राईट्स’मध्ये ‘या’ पदांसाठी भरती जाहीर

SSC Exam Schedule: SSC ची मोठी घोषणा! नोव्हेंबर २०२६ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ परीक्षेच्या तारखांमध्येही मोठे बदल
2

SSC Exam Schedule: SSC ची मोठी घोषणा! नोव्हेंबर २०२६ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ परीक्षेच्या तारखांमध्येही मोठे बदल

Nurses Foreign Language Rule: सरकारचा मोठा निर्णय! नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना आता शिकावी लागणार परदेशी भाषा
3

Nurses Foreign Language Rule: सरकारचा मोठा निर्णय! नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना आता शिकावी लागणार परदेशी भाषा

UGC Net 2026: यूजीसी नेट अर्जदारांसाठी खूशखबर! करेक्शन विंडो सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करा बदल
4

UGC Net 2026: यूजीसी नेट अर्जदारांसाठी खूशखबर! करेक्शन विंडो सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.