Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chanakya Niti: विद्यार्थ्यांमध्ये असायला हवेत ‘हे’ ५ गुण; यशाचे शिखर गाठण्यासाठी आचार्य चाणक्यांचे मोलाचे सूत्र!

Chanakya Niti for Students: जीवनात अव्वल स्थान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कावळा, बगळा आणि कुत्र्याचे कोणते गुण असायला हवेत? आचार्य चाणक्यांनी सांगितलेला 'गृहत्यागी' शब्दाचा खरा अर्थ काय? जाणून घ्या सविस्तर

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 31, 2026 | 09:16 AM
chanakya niti

chanakya niti

Follow Us
Follow Us:

Chanakya Niti for Students: प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते की त्याने आपल्या अभ्यासात अव्वल यावे आणि समाजात उच्च स्थान प्राप्त करावे. परंतु, या पदापर्यंत पोहचण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान मिळवणे पुरेसे नाही, तर जीवनात शिस्त अंगिकारणे देखील महत्त्वाचे आहे. महान अर्थतज्ञ आणि मार्गदर्शक आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे सूत्र सांगितले आहेत चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

चाणक्य नीतीमध्ये शिक्षणाचा अर्थ समजावणारा श्लोक

श्लोक: विद्या ददाति विनयं विनयाद्याति पात्रताम l पात्रत्वाद्धनमाप्नोति धनाद्धर्मं तत: सुखम् ll

अर्थ – विद्या (ज्ञान) सर्वप्रथम माणसाला विनम्रता देते. ज्याच्या अंगी नम्रता असते, त्यांच्याकडे पात्रता आपोआप येते. पात्र आणि योग्य व्यक्तीच योग्य मार्गाने धन पैसा कमवू शकतो आणि त्या धनातून समाजकल्याणाची कामे करू शकतो. यातून आपल्याला ही शिकवण मिळते की, जर ज्ञान मिळाल्यानंतर तुमच्यात अहंकार येत असेल तर समजा तुम्ही चुकीच्या दिशेने जात आहात.

Cricket Umpire Career: क्रिकेट मॅच फिरवणारे ‘अंपायर’ कसे बनता येते? जाणून घ्या शिक्षण, पात्रता अन् निवड प्रक्रिया!

आदर्श विद्यार्थ्याची ५ लक्षणे

आचार्य चाणाक्य यांनी विद्यार्थी जीवन यशस्वी करण्यासाठी पाच नियम सांगितले आहेत. जे प्रत्येक विद्यार्थ्यांने त्याच्या आचरणात आणले पाहिजेत.

श्लोक : काक चेष्टा बको ध्यानं श्वान निद्रा तथैव च। अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंच लक्षणम्॥

अर्थ – काक चेष्टा (कावळ्यासारखी उत्सुकता): ज्याप्रमाणे कावळा आपले ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो. त्याचप्रकारे विद्यार्थ्यांने जीवनात नेहमी नवीन शिकण्याची तीव्र इच्छा आणि निरंतर प्रयत्न करण्यासाची सवय अंगीकारायला हवी.

बको ध्यानं (बगळ्यासारखी एकाग्रता): अभ्यास करताना तुमचे लक्ष बगळ्यासारखे एकाग्र असले पाहिजे, जो पाण्यात अगदी शांत राहून केवळ आपल्या माशावर ध्येयावर लक्ष केंद्रीत करतो.

श्वान निद्रा (कुत्र्यासारखी सतर्कता): विद्यार्थ्यांची झोप ही अतिशय गाढ नसावी तर कुत्र्याप्रमाणे अगदी लहानशा आवाजानेही लगेच जागे होण्याची सतर्कता तुमच्याकडे असायला हवी, जेणेकरून वेळ वाया जाणार नाही.

IIM Mumbai Jobs: आयआयएम मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज!

अल्पाहारी (संतुलित आहार): जास्त जेवल्याने शरीरात नेहमी आळस आणि सुस्ती येते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांने नेहमी संतुलित आणि गरजेनुसार जेवण केले पाहिजे.

गृहत्यागी (मोह मायेपासून दूर राहणे): येथे ‘गृहत्यागी’ याचा अर्थ हा घर सोडणे असा नाही तर अभ्यासाच्या काळात सुख-सुविधा आरामदायी आयुष्य आणि घरच्या मोह मायेपासून दूर राहून केवळ आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रीत करणे असा होते.

Web Title: Chanakya niti for students five qualities of ideal student education meaning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • Chanakya Niti
  • chanakyaniti for success
  • Student Career Tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.