फोटो सौजन्य- सोशल मीडिया
IIM Mumbai Jobs: देशातील नामांकित आणि प्रतिष्ठित व्यवस्थापन संस्थांपैकी एक असलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई’ (IIM Mumbai) ने तरुणांसाठी करिअरची मोठी संधी जाहीर केली आहे. संस्थेने कंत्राटी तत्त्वावर (Contractual Basis) ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या १० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत सर्वाधिक ४ पदे अॅडमिन विभागासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. आयआयएम मुंबईची ही ऑनलाईन प्रक्रिया २७ मे पासून सुरू झाली असून इच्छुक उमेद्वारांना १६ जून २०२६ पर्यंत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
या रिक्त पदांसाठी उमेद्वारांकडे संबंधित क्षेत्रातील किमान ६०% गुणांसह मास्टर डिग्री (M.B.A./Post Graduation), बी.टेक. (B.Tech.) किंवा समकक्ष व्यवसायिक पदवी असणे आवश्यक आहे. संस्थेने स्पष्ट केले आहे की, ज्या उमेद्वारांना संबंधित कामाचा अनुभव आहे किंवा जे पीएचडी (Ph.D.) करत आहेत किंवा पीएचडी करण्याचा विचार करत आहेत, त्यांना या भरतीसाठी प्राधान्य दिले जाईल.
सर्वसाधारण उमेद्वारांसाठी कमाल वयोमर्यादा ३२ वर्ष तर अनुभवी पीएचडी धारक उमेद्वारांना वयोमर्यादेत ३५ वर्षापर्यंत सवलत दिली जाईल. निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा, स्किल टेस्ट, मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) यांचा समावेश असेल.
आयआयएम मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, या नियुक्त्या करार तत्वानुसार असतील. नंतर संस्थेच्या गरजेनुसार हा करार वाढवला जाऊ शकतो. निवड झालेल्या उमेद्वारांना दरमहा मूळ वेतन ३५,००० ते ४५,००० दरम्यान दिले जाईल. तर याशिवाय उमेदवारांना घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि मोबाईल भत्ता अतिरिक्त दिला जाईल.
| विभाग | पद संख्या | मूळ वेतन | एकूण वेतन |
|---|---|---|---|
| अॅडमिन (प्रशासन) | ४ | ३५,००० ते ४५,००० रुपये | ४५,५०० ते ५५,५०० रुपये |
| अॅनालिटिक्स अँड डिसिजन सायन्स | १ | ३५,००० ते ४५,००० रुपये | ४५,५०० ते ५५,५०० रुपये |
| ऑपेरशन्स अँड सप्लाय चेन | १ | ३५,००० ते ४५,००० रुपये | ४५,५०० ते ५५,५०० रुपये |
| सस्टेनेबल मॅनेजमेंट | १ | ३५,००० ते ४५,००० रुपये | ४५,५०० ते ५५,५०० रुपये |
| ओबीएचआर | १ | ३५,००० ते ४५,००० रुपये | ४५,५०० ते ५५,५०० रुपये |
| मार्केटिंग | २ | ३५,००० ते ४५,००० रुपये | ४५,५०० ते ५५,५०० रुपये |
| एकूण | १० | ३५,००० ते ४५,००० रुपये | ४५,५०० ते ५५,५०० रुपये |






