Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चंद्रकांत पाटील यांची घोषणा ! लवकरच ‘या’ महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी सुरु होणार एक लाख रुपयांची विशेष शिष्यवृत्ती

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. सिडनहॅम महाविद्यालयात वाणिज्य विभागात पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनीला विशेष शिष्यवृत्ती मिळणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 18, 2025 | 08:11 PM
चंद्रकांत पाटील यांची महत्वाची घोषणा

चंद्रकांत पाटील यांची महत्वाची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

देशातील कर्तबगार स्त्रियांचा आदर्श आजच्या विद्यार्थिनींनी घेऊन आपापल्या क्षेत्रात अग्रेसर राहिले पाहिजे, असे गौरवोद्गार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले. सिडनहॅम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि आशिया खंडातील पहिल्या महिला वाणिज्य पदवीधर श्रीमती यास्मिन खुर्शीदजी सर्वेअर यांच्या पदवीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांना बोलावण्यात आले होते. यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला कर्मचारी श्रीमती यास्मिन सर्वेअर यांच्या सन्मानार्थ बँकेच्या प्रायोजकत्वाने महाविद्यालयात स्थापित श्रीमती सर्वेअर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की यास्मिन सर्वेअर यांनी १८ ऑगस्ट १९२५ रोजी सिडनहॅम महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली होती. त्या काळात महिलांनी उच्च शिक्षण घेणे हे दुर्मिळ मानले जात असल्याने त्यांचा हा प्रवास ऐतिहासिक ठरला. आज वाणिज्य क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या महिलांना श्रीमती यास्मिन सर्वेयर यांनी शंभर वर्षांपूर्वी वाणिज्य विभागाचे दालन खुले करून दिले. आजच्या विद्यार्थिनींसाठी त्या प्रेरणास्थान आहेत. यावर्षीपासून महाविद्यालय व सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सिडनहॅम महाविद्यालयात वाणिज्य विभागात पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनींसाठी श्रीमती यास्मिन सर्वेयर यांच्या नावाने एक लाख रुपयांची विशेष शिष्यवृत्ती सुरू करण्यात येत आहे.

Judge Eligibility: न्यायाधीश होण्यासाठी वकिलीचा किती अनुभव आवश्यक आहे? योग्यता काय ?

माजी विद्यार्थिनी व प्रसिद्ध पार्श्वगायिका संजीवनी भेलांडे यांनी इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या मिराबाई यांच्या रचना सादर केल्या. याचे औचित्य साधून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालयासाठी एका नवीन स्पर्धेची घोषणा केली. दर महिन्याला मीराबाईंची एक रचना संजीवनी भेलांडे देतील, त्याचे अर्थपूर्ण विवेचन स्वतःच्या आवाजात करणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनीस पंचवीस हजारांचे रोख पारितोषिक देण्यात येईल. या उपक्रमाची सुरुवात आतापासूनच करूयात असे आवाहनही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.

मीराबाईंच्या भजनाचे गायन आणि विवेचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस जाहीर

उपस्थित विद्यार्थ्यांपैकी मीराबाईंच्या भजनाचे वाचन आणि विवेचन करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुपये दहा हजार रोख बक्षीस दिले. राज्यातील महिलांच्या सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी राज्य शासन त्यांना पेन्शन आणि व्यवसाय उभारण्यासाठी मदत करण्याच्या विचारात आहे. तसेच डॉ.होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये होणाऱ्या नाविन्यपूर्ण विविध कोर्सेस आणि उपक्रमांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केले.

यावर्षीपासून महाविद्यालय व सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सिडनहॅम महाविद्यालयात वाणिज्य विभागात पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनींसाठी श्रीमती यास्मिन सर्वेयर यांच्या नावाने एक लाख रुपयांची विशेष शिष्यवृत्ती सुरू करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

Education Loan: एज्युकेशन लोन सतत रिजेक्ट होतंय का? तुम्ही ‘या’ चुका तर करत नाहीये, नक्की तपासा

या कार्यक्रमास मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत, सिडनहॅमच्या माजी विद्यार्थिनी श्रीमती दिलनवाज वारीयावा, पार्श्वगायिका संजीवनी भेलांडे, यास्मिन सर्वेयर यांचे नातेवाईक श्री सोली कूपर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या श्रीमती पॉपी शर्मा, सिडनहॅम महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास धुरु यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. श्रीनिवास धुरु यांनी सर्वांचे आभार मानले.

Web Title: Chandrakant patil announced special scholarship for female students of sydenham college

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 08:11 PM

Topics:  

  • Career
  • Career News
  • chandrakant patil

संबंधित बातम्या

Education Loan: एज्युकेशन लोन सतत रिजेक्ट होतंय का? तुम्ही ‘या’ चुका तर करत नाहीये, नक्की तपासा
1

Education Loan: एज्युकेशन लोन सतत रिजेक्ट होतंय का? तुम्ही ‘या’ चुका तर करत नाहीये, नक्की तपासा

Top 7 Government Jobs Last Date 2025: या आठवड्यात 7 मोठ्या सरकारी नोकरीची भरतीची शेवटची तारीख, त्वरीत करा अर्ज
2

Top 7 Government Jobs Last Date 2025: या आठवड्यात 7 मोठ्या सरकारी नोकरीची भरतीची शेवटची तारीख, त्वरीत करा अर्ज

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर
3

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

कॉर्पोरेट लाईफ टिप्स: ‘या’ चुका करणे टाळा… ऑफिस जाणाऱ्या तरुणांनी नक्की वाचा
4

कॉर्पोरेट लाईफ टिप्स: ‘या’ चुका करणे टाळा… ऑफिस जाणाऱ्या तरुणांनी नक्की वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.