फोटो सौजन्य - Social Media
कोस्ट गार्ड नाविक पदासाठी भरती आयोजित करण्यात आली होती. इंडियन कोस्ट गार्ड (ICG)ने या भरतीचे आयोजन केले होते. एकूण ३०० रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली होती. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर नक्कीच तुम्ही या लेखाचा आढावा घेण्यात यावा. २१ जानेवारी २०२५ रोजी अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता होते. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार होते. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी Indian Coast Guard च्या joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिले होते.
या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला किमान २१,७०० रुपयांपासून ते ६९,१०० रुपये वेतन मिळण्याची शक्यता आहे. उमेदवारांनी ११ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान या भरतीसाठी अर्ज केले आहे. जर यात काही त्रुटी आढळल्या तर तुम्ही त्या सुधारू शकता. या त्रुटींना सुधारता येणार आहे.
या भरतीसाठी काही पात्रता निकष निश्चित करण्यात आले होते. अधिसूचनेमध्ये नमूद शैक्षणिक पात्रता निकषांनुसार, नाविक जनरल ड्युटीच्या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य होते. तर उमेदवार Physics & Maths विषयांसह बारावी उत्तीर्ण असावा. नाविक डोमेस्टिक ब्रांच पदासाठी उमेदवारांना दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. नाविक जनरल ड्युटीच्या पदासाठी एकूण २६० जागा रिक्त आहेत. तर नाविक डोमेस्टिक ब्रांचच्या पदासाठी एकूण ४० जागा रिक्त आहेत. अशा एकूण ३०० रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
अधिसूचनेमध्ये नमूद असणाऱ्या शैक्षणिक अटीनुसार, किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत होते. तर जास्तीत जास्त २२ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत होते. जर तुम्ही या भरतीच्या प्रक्रियेत सहभाग घेतला असेल आणि तुमचा अर्ज नोंदवला असेल तर तुमचा अर्ज तपासून घ्यावा. जर काही त्रुटी आढळ्यास ताबडतोब त्याला दुरुस्त करून घ्याव्यात. करेक्शन विंडो काही काळापर्यंतच खुली असणार आहे, त्यामुळे त्रुटी आढळ्यास वेळ न दवडता त्यास सुधारून घ्यावे.