फोटो सौजन्य - Social Media
बारावीच्या नंतर आपल्या खऱ्या आयुष्याला सुरुवात होते. आयुष्यातील हा एक महत्वाचा वळण मानला जातो. आयुष्याच्या या फेजमध्ये घेण्यात येणारा निर्णयावर आपले आयुष्य उभारले जाते. आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या निर्णयांमधील एक महत्वाचा निर्णय म्हणजे करिअर. बारावी झाल्यावर विद्यार्थी या निर्णयाचा मागे लागतात. कधी कधी या निर्णयात चुका झाल्यामुळे आयुष्यभर त्रास भोगावा लागतो. आपल्या मित्राने एखादा पर्याय निवडला म्हणून आपण तेथे जाणे अशाने आपले आयुष्य वेटाकुटिला जाते. निर्णय कधीही स्वतःचा स्वतःच घेतला पाहिजे आणि हा निर्णय घेण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे.
करिअर सारखा महत्वाचा निर्णय घेताना आपली क्षमता आणि आपले रस ओळखून घ्या. ज्या क्षेत्रात आपण तरबेज आहोत आणि ज्या क्षेत्रात आपण काम करू इच्छित आहोत, त्याच क्षेत्रामध्ये जाण्याचे धाडस करा. इतर क्षेत्रात जाऊन जोरजबरदस्तीने काम करण्यापेक्षा आपल्या आवडीच्या क्षेत्रात जाऊन मनापासून काम करणे कधीही उत्तम असते. त्यामुळे करिअरचा निर्णय अगोदर स्वतःवर अभ्यास करा. स्वतःला पारखून पहा.
पण फक्त स्वतःवर अभ्यास आणि संशोधन करणे गरजेचे नसते. संशोधन संपुर्णपणे झाले पाहीजे. ज्या क्षेत्रात आपण जात आहोत, त्या क्षेत्रात जाणे खरंच फायद्याचे आहे का? त्या क्षेत्रात पुढे स्कोप आहे का? त्या क्षेत्रात पुढे जर काही बदल झाले तर त्या गोष्टीचा आपल्या करिअरवर काय परिणाम होऊ शकतो? या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. आणि नंतरच या क्षेत्राचा विचार केला पाहीजे.
ज्या क्षेत्रात आपण जात आहोत त्या क्षेत्रामध्ये ज्या कौशल्यांची गरज आहे, ते अंगीकृत करणे गरजेचे असते. या कौशल्यांना अंगीकृत करण्यासाठी प्रशिक्षण घ्या. नियमित सराव करत चला. असे केल्याने कौशल्य वाढ होईल आणि त्या क्षेत्रात उत्तम भवितव्य घडवता येईल. आपण नेहमी अनुभवींचा सल्ला घेतला पाहिजे, कारण तंत्रज्ञानात वाढ होत आहे. या वाढीमुळे भविष्यात अनेक कामे जाण्याची शक्यता आहे. तसेच भविष्यात नवीन कामे येण्याची शक्यता आहेत.