Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education Secretary: उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी दीप्ति गौर मुखर्जी यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहेत त्या!

Higher Education Secretary: केंद्र सरकारने नीट (NEET) विवाद दरम्यान आयएएस अधिकारी दीप्ति गौर मुखर्जी यांना उच्च शिक्षण विभागाचे नवीन सचिव म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्या शिक्षण आणि पगाराबद्दल वाचा सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 11, 2026 | 01:32 PM
mukhargi

mukhargi

Follow Us
Follow Us:

Higher Education Secretary:  गेल्या काही दिवसांत देशभरात विविध मुद्द्यांवरून विद्यार्थ्यांचे निदर्शने आणि विरोध प्रदर्शन पाहायला मिळाले, ज्यापैकी सर्वात चर्चेत राहिलेले आंदोलन म्हणजे नीट पेपर लीक प्रकरणाशी संबंधित आहे. देशात नीट विवाद झाल्यानंतर केंद्र सरकारने उच्च शिक्षण विभागात मोठे फेरबदल केले आहेत. याद्वारे वरिष्ठ आयएएस अधिकारी दीप्ति गौर मुखर्जी यांची उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याआधी हे पद सांभाळणाऱ्या विनीत जोशी यांच्या जागेवर दीप्ति गौर मुखर्जी यांची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण भारतभर नीट पेपर लीकचा वाद चांगलाच तापलेला असताना त्यांच्यावर या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी आली आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण क्षेत्रातील या सर्वोच्च पदाची सूत्रे हाती घेणाऱ्या आयएएस अधिकारी दीप्ति गौर मुखर्जी नेमक्या कोण आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

१९९३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत दीप्ति गौर मुखर्जी

केंद्र सरकारने उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदाची जबाबदारी ज्या महिला अधिकाऱ्यावर सोपवली आहे, त्या मध्य प्रदेश कॅडरच्या १९९३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. या पदावर येण्यापूर्वी दीप्ति या कॉरपोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सचिव म्हणून नियुक्त होत्या. आता त्यांचे हे पद युवा कार्यक्रम सचिव पल्लवी जैन गोविल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. विनीत जोशी यांच्या जागी दीप्ति गौर उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिव बनल्या आहेत, तर पल्लवी जैन गोविल या आता नवीन कॉरपोरेट व्यवहार सचिव म्हणून पदभार स्वीकारतील.

PIB Fact Check: विद्यार्थ्यांसाठी खरोखरच मोफत लॅपटॉप मिळतोय का? PIB फॅक्ट चेकने उघड केले मोठे सत्य; वाचा सविस्तर..

दीप्ति गौर मुखर्जी यांचे शिक्षण किती झाले आहे?

त्यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, उच्च शिक्षण विभागाच्या सचिव असलेल्या दीप्ति गौर मुखर्जी यांनी भारताची प्रतिष्ठित संस्था असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) अर्थशास्त्र विषयात मास्टर्सचे शिक्षण घेतले आहे. याशिवाय, त्यांनी ब्रिटनच्या प्रसिद्ध ‘लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’ या संस्थेतून पब्लिक मॅनेजमेंट आणि गव्हर्नन्समध्ये मास्टर (M.Sc.) पदवी प्राप्त केली आहे. १९९३ मध्ये त्यांनी संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यानंतर त्यांना मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारीपदाची संधी मिळाली.

Google Job Offer: ५५ लाखांच्या गुगलच्या ऑफरसाठी ४० लाखांची नोकरी सोडावी का? नोएडाच्या टेक प्रोफेशनलची सोशल मीडियावर चर्चा!

नवीन उच्च शिक्षण सचिव दीप्ति गौर मुखर्जी यांना किती पगार मिळणार?

भारत सरकारच्या उच्च शिक्षण सचिव पदाचा समावेश ७ व्या वेतन आयोगांतर्गत पे लेव्हल १७ मध्ये होतो. या पदावर २,२५,००० रुपये प्रतिमहिना इतका निश्चित मूळ पगार दिला जातो. याशिवाय, मूळ वेतनाच्या सुमारे ५०% किंवा त्याहून अधिक महागाई भत्ता मिळतो, जो वेळोवेळी वाढत राहतो. सोबतच वाहतूक भत्ता आणि इतर शासकीय भत्त्यांचा लाभही मिळतो. सर्व काही मिळून या पदावर दरमहा साधारणपणे ३.३ लाख ते ३.५ लाख रुपयांच्या आसपास पगार बनतो.

Web Title: Deepti gaur mukerjee higher education secretary marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • controversy
  • education
  • NEET

संबंधित बातम्या

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
1

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
2

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
3

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!
4

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.