Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

NEET PG 2026 result: एनबीईएमएस (NBEMS) ने नीट पीजी २०२६ परीक्षा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जाऊन आपला निकाल आणि कटऑफ तपासू शकतात. निकालाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 24, 2026 | 06:18 PM
neet pg

neet pg

Follow Us
Follow Us:

नीट पीजी २०२६ (NEET PG 2026) परीक्षेला बसलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. NBEMS ने नीट पीजी २०२६ चा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार आपला निकाल NBEMS च्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जाऊन पाहू शकतात. निकालामध्ये उमेदवाराचे मिळालेले गुण, पर्सेंटाईल आणि ऑल इंडिया रँकसह इतर माहिती देण्यात आली आहे. यावर्षी नीट पीजी परीक्षा ३० ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत सुमारे २.६५ लाख उमेदवार सहभागी झाले होते. तसेच, जयपूरमधील काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक बिघाडामुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ५ सप्टेंबर रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आली होती. आता या सर्व उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

असा तपासा नीट पीजी २०२६ चा निकाल

1. नीट पीजी २०२६ चा निकाल तपासण्यासाठी सर्वात पहिले nbe.edu.in या वेबसाइटवर जा.

2. त्यानंतर नीट पीजी २०२६ निकाल (Result) या लिंकवर क्लिक करा.

3. आता विचारलेली लॉगिन डिटेल्स भरा.

4. त्यानंतर स्क्रीनवर तुमचा निकाल दिसून येईल.

5. निकालामध्ये गुण, रँक, पर्सेंटाईल आणि पात्रता स्थिती तुम्ही तपासू शकता.

6. निकाल तपासल्यानंतर त्याची प्रत डाऊनलोड करून सुरक्षित ठेवा.

नीट पीजी २०२६ कटऑफ किती राहिला?

  • जनरल / ईडब्ल्यूएस: ५० वा पर्सेंटाईल – कटऑफ २६२
  • जनरल / पीडब्ल्यूडी: ४५ वा पर्सेंटाईल – कटऑफ २४४
  • एससी / एसटी / ओबीसी आणि या वर्गातील पीडब्ल्यूडी: ४४ वा पर्सेंटाईल – कटऑफ २२६
Employment Fair 2026: महिलांसाठी सुवर्णसंधी! SNDT विद्यापीठात ‘या’ तारखेला भव्य ‘रोजगार मेळावा’; जपानमध्ये नोकरीचीही संधी

२,६५,९८० उमेदवार परीक्षा झाले होते सहभागी

नीट पीजी २०२६ ची परीक्षा ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत एकाच सत्रात घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी २,७३,०९६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २,६५,९८० उमेदवार परीक्षेत सहभागी झाले होते. ही परीक्षा देशभरातील ३३९ शहरांमधील १,१११ केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती.

निकालात कोणती माहिती मिळेल?

नीट पीजी निकालामध्ये उमेदवाराचे नाव, रोल नंबर, परीक्षेचे नाव, विषय, क्षेत्र, मिळालेले एकूण गुण, पर्सेंटाईल, रँक आणि पात्रता स्थिती यांसारखी माहिती दिली आहे. NBEMS ने जाहीर केलेला निकाल चालू २०२६-२७ प्रवेश सत्रासाठी वैध आहे. याच्या आधारे उमेदवार एमडी, एमएस आणि पीजी डिप्लोमा यांसारख्या पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कोर्सेसच्या पुढील प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊ शकतील.

Junk Food Ban Near Schools: पिझ्झा, बर्गर खाणाऱ्या मुलांच्या अडचणी वाढणार; शाळांच्या परिसरात ‘हे’ पदार्थ मिळणार नाहीत!

नीट पीजी स्कोर कार्ड कधी मिळणार?

निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांसाठी वैयक्तिक स्कोर कार्ड देखील उपलब्ध करून दिले जाईल. अपडेटनुसार, १ ऑक्टोबर २०२६ पासून स्कोर कार्ड डाऊनलोड करता येईल. यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांच्या युजरनेम आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करावे लागेल.

Web Title: Neet pg 2026 result declared cutoff

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • education
  • NEET PG Exam
  • NEET PG Result

संबंधित बातम्या

IIT BHU Physical AI Course: आयआयटी बीएचयूमध्ये पुढील वर्षापासून सुरू होणार ‘फिजिकल एआय’चा बीटेक कोर्स, जाणून घ्या याबद्दल सविस्तर
1

IIT BHU Physical AI Course: आयआयटी बीएचयूमध्ये पुढील वर्षापासून सुरू होणार ‘फिजिकल एआय’चा बीटेक कोर्स, जाणून घ्या याबद्दल सविस्तर

Cost of Studying Abroad: विदेशात शिक्षण किती महाग? बीए सारख्या सामान्य पदवीसाठीही मोजावे लागतात लाखो रुपये!
2

Cost of Studying Abroad: विदेशात शिक्षण किती महाग? बीए सारख्या सामान्य पदवीसाठीही मोजावे लागतात लाखो रुपये!

CBSE Board Exam 2027: सीबीएसईने जारी केली १० वी आणि १२ वीच्या परीक्षांची विषयनिहाय गुण विभागणी; जाणून घ्या संपूर्ण पॅटर्न
3

CBSE Board Exam 2027: सीबीएसईने जारी केली १० वी आणि १२ वीच्या परीक्षांची विषयनिहाय गुण विभागणी; जाणून घ्या संपूर्ण पॅटर्न

SSC HSC & CBSE Exam: स्टेट बोर्ड आणि सीबीएससी दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सर्व विषयांच्या तारखा
4

SSC HSC & CBSE Exam: स्टेट बोर्ड आणि सीबीएससी दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सर्व विषयांच्या तारखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.