
फोटो सौजन्य - Social Media
या वर्षी विद्यापीठाने भारतात प्रथमच आंतरविद्याशाखीय मानव्यविद्या आणि सामाजिक विज्ञान (IHS) या क्षेत्रातील बी.ए. (संशोधन) कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या अभ्यासक्रमाची रचना अशी ठेवण्यात आली आहे की विद्यार्थ्यांना तीन विशेष शाखांपैकी निवड करण्यापूर्वी नैसर्गिक विज्ञान, सामाजिक विज्ञान, भू-राजकारण, व्यवसाय व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर संबंधित विषयांचा मजबूत पाया मिळतो. यात शाश्वतता अभ्यास, पुरातत्त्व वारसा अभ्यास आणि समाज संस्कृती तंत्रज्ञान हे तीन प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. कोणत्याही शैक्षणिक शाखेतील हायस्कूल विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. शैक्षणिक विभागाचे असोसिएट डीन डॉ. राजीव कुमार सिंग यांनी सांगितले की, युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांना अकादमिक उत्कृष्टतेसोबतच समीक्षात्मक विचार, क्रिएटिव्हीटी आणि सर्वांगीण विकासाचा अनुभव देण्यास कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम नेतृत्व म्हणून घडवणे हे विद्यापीठाचे प्रमुख ध्येय आहे.
अपवादात्मक विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने प्रत्येक बॅचमध्ये दहा पूर्ण शिष्यवृत्ती जाहीर केल्या आहेत. या शिष्यवृत्तींमध्ये चार वर्षांचे 100% शिक्षण शुल्क समाविष्ट आहे. याशिवाय विद्यापीठाकडून इतर अनेक शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्याच्या योजना देखील उपलब्ध आहेत. या नवीन कार्यक्रमाचे नेतृत्व मानविकी आणि सामाजिक विज्ञान शाळेचे डीन प्राध्यापक रजत कथुरिया आणि विद्यापीठातील प्रतिष्ठित प्राध्यापक करणार आहेत. या कार्यक्रमातून विद्यार्थी भूराजनीती, हवामान बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता, जागतिक अर्थव्यवस्था, संस्कृती आणि तंत्रज्ञानातील नवीन ट्रेंड समजावून घेऊ शकतात. पुढे शैक्षणिक क्षेत्र, स्टार्ट-अप्स, सरकार, संशोधन संस्था, मीडिया, डिझाइन आणि धोरणनिर्मिती अशा विविध क्षेत्रांत करिअरच्या संधी उपलब्ध होतात. चार वर्षांच्या बी.ए. (संशोधन) IHS कार्यक्रमामध्ये पहिल्या वर्षी नैसर्गिक विज्ञान, सामाजिक विज्ञान, डिजिटल मानविकीशास्त्र, नीतिशास्त्र, संप्रेषण आणि AI यांचा समावेश असलेला मुख्य अभ्यासक्रम दिला जातो. विद्यार्थ्यांना बी.ए. (ऑनर्स), बी.ए. (संशोधन) किंवा अल्पविषयासह अभ्यासक्रम करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. एक अनिवार्य AI लिटरसी मॉड्यूलही देण्यात आले आहे, ज्यामध्ये विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाचा नैतिक आणि नवकल्पक वापर शिकतात. याशिवाय इंटर्नशिप, अनुभवाधारित शिक्षण, फील्डवर्क, आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण आणि उन्हाळ्यातील प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश आहे.
2011 साली स्थापन झालेली शिव नाडर युनिव्हर्सिटी 286 एकरच्या विस्तीर्ण निवासी कॅम्पसमध्ये पसरली असून येथे 4000 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि 250 हून अधिक प्राध्यापक शिक्षण घेतात. 2022 मध्ये या विद्यापीठाला ‘इन्स्टिट्यूशन ऑफ एमिनन्स’ हा दर्जा मिळाला असून यातील करिअर डेव्हलपमेंट सेंटर (CDC) विद्यार्थी प्लेसमेंट आणि इंटर्नशिपसाठी अग्रणी संस्थांशी सहकार्य करते. युनिव्हर्सिटीचे पदवीधर गोल्डमन सॅक्स, मॅककिन्से अँड कंपनी, IBM, गूगल, डेल, KPMG यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत, तर अनेक विद्यार्थ्यांना जागतिक विद्यापीठांमध्ये थेट पीएच.डी.सह उच्च शिक्षणासाठी प्रवेश उपलब्ध होतो.