Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CET च्या नोंदणीस मुदतवाढ! ‘या’ संकेतस्थळावर करता येईल अर्ज; B.HMCT, BCA, BBA, BBM…

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या MHT CET परीक्षेच्या नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 05, 2026 | 05:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या MHT CET परीक्षेच्या नोंदणीस राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने मुदतवाढ दिली आहे. बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (बीएचएमसीटी), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए), बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) तसेच एमबीए (इंटिग्रेटेड) आणि एमसीए (इंटिग्रेटेड) या सात अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता १८ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ४ मार्च होती.

Amravati News : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा आक्षेप;१०-१२ वी परीक्षेसाठी शिक्षकांची नेमणूक नको

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, या सात अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत एकूण ५६ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळावी आणि उर्वरित इच्छुकांना अर्ज करता यावा यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज, नोंदणीचे वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याद्वारे ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन कक्षाने केले आहे.

या अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा २८ एप्रिल २०२६ रोजी सुरु होणार आहे, तर ही परीक्षा ३० एप्रिल २०२६ या तारखे दरम्यान घेण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जकर्त्यांनी या परीक्षेच्या तयारीला लागावे लागणार आहे. ही परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत नोंदणी करून परीक्षेची तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्जन कसे होतात? मेडिकलमध्ये व्हायायचंय पारंगत? ‘हे’ आहेत काही स्टेप्स 

दरम्यान, मागील वर्षीही या अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. २०२५ मध्ये बीएचएमसीटी सीईटीसाठी १,४३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम, एमबीए (इंटिग्रेटेड) आणि एमसीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी एकूण १ लाख १२ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यंदाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Cet registration deadline extended applications can be made on this website

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • Career
  • CET Exam

संबंधित बातम्या

India’s High Paying Jobs: नोकरी शोधताय? ‘या’ क्षेत्रात आहे बक्कळ पैसा
1

India’s High Paying Jobs: नोकरी शोधताय? ‘या’ क्षेत्रात आहे बक्कळ पैसा

खोटी माहिती पसरवणाऱ्यांनो सावधान! CET कक्षाबाबत चुकीची माहिती दिली तर थेट…
2

खोटी माहिती पसरवणाऱ्यांनो सावधान! CET कक्षाबाबत चुकीची माहिती दिली तर थेट…

Pune Municipal: नियमांना फाटा देत थेट पदभरती; ४५ माजी कर्मचाऱ्यांच्या फेरनियुक्तीचा घाट
3

Pune Municipal: नियमांना फाटा देत थेट पदभरती; ४५ माजी कर्मचाऱ्यांच्या फेरनियुक्तीचा घाट

Reddit Viral Story: कोणतेही काम न करता कमावले तब्बल ४.७ कोटी रुपये! कॉर्पोरेट जगतातील थक्क करणारी व्हायरल घटना एकदा वाचाच
4

Reddit Viral Story: कोणतेही काम न करता कमावले तब्बल ४.७ कोटी रुपये! कॉर्पोरेट जगतातील थक्क करणारी व्हायरल घटना एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.