Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही; पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमधील काम पूर्ण

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ५२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 07, 2026 | 06:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना वेगाने राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे शाळांमधील वातावरण अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शालेय वाहतूक नियमांच्या तपासणीसाठी राज्यभर विशेष मोहीम राबविणार! मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

जिल्हा नियोजन समितीमार्फत सन २०२४-२५ या वर्षासाठी उपलब्ध निधीतून पहिल्या टप्प्यात एकूण ५४२ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. या अंतर्गत विविध तालुक्यांमध्ये टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करण्यात आले आहे. कल्याण तालुक्यातील १२० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. तसेच भिवंडी तालुक्यातील ३०८ शाळांमध्येही सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. अंबरनाथ तालुक्यात ९६ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले असून उर्वरित १८ शाळांमधील काम सध्या प्रगतीपथावर आहे. अशा प्रकारे एकूण ५२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने या उपक्रमाला पुढील टप्प्यातही गती देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध निधीतून आणखी शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार मुरबाड गटातील ३२९ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम नियोजित वेळेत सुरू असून या सर्व शाळांमधील यंत्रणा मार्च २०२६ अखेरपर्यंत कार्यान्वित होणार आहेत.

तसेच शहापूर गटातील ४५७ शाळांमध्येही सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू असून या शाळांमधील सर्व यंत्रणा एप्रिल २०२६ अखेरपर्यंत सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या संदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले असून उर्वरित शाळांमध्येही लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शाळांमधील वातावरण अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहण्यास मदत होईल.

Educational Success Story : ‘हेमकृष्ण पिसदे’ जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे उत्तम उदाहरण… गोंदियाचा पठ्ठ्या झाला साहेब! 

जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक पारदर्शक ठेवण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. शाळेच्या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवणे, अनुचित प्रकारांना आळा घालणे आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे या उद्देशाने सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Cctv in schools for the safety of students in thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • Career
  • CCTV
  • Thane news

संबंधित बातम्या

Kalyan News : के. डी. रेसिडेन्सी हॉटेलवर पोलिसांचा छापा; बेकायदा पार्टीप्रकरणी 7 आयोजकांवर गुन्हा, 65 तरुण-तरुणी ताब्यात
1

Kalyan News : के. डी. रेसिडेन्सी हॉटेलवर पोलिसांचा छापा; बेकायदा पार्टीप्रकरणी 7 आयोजकांवर गुन्हा, 65 तरुण-तरुणी ताब्यात

Washim News: जिल्ह्यातील सर्व जि. प. शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा, भीमसंग्राम संघटने दिला आंदोलनचा जिल्हा प्रशासनाला इशारा
2

Washim News: जिल्ह्यातील सर्व जि. प. शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा, भीमसंग्राम संघटने दिला आंदोलनचा जिल्हा प्रशासनाला इशारा

गणेशोत्सवापूर्वीच झेंडूच्या फुलांचे भाव कोसळले; ८० रुपयांचा किलो थेट १० रुपयांवर!
3

गणेशोत्सवापूर्वीच झेंडूच्या फुलांचे भाव कोसळले; ८० रुपयांचा किलो थेट १० रुपयांवर!

High paying jobs: कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ ५ नोकऱ्यांमध्ये मिळतो कोटींचा पगार……
4

High paying jobs: कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ ५ नोकऱ्यांमध्ये मिळतो कोटींचा पगार……

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.