फोटो सौजन्य - Social Media
भारतात २८,००० पर्यंत तर शक्यतो महिन्याचा पगार असतो. परंतु, टेस्लाच्या या संधीमार्फत तुम्ही तीच रक्कम एका दिवसाला कमावू शकतो. आता एका दिवसाला २८ हजार म्हणजे २० दिवस काम केले तर ५.६० लाख रक्कम तुम्ही आरामात तुमच्या नावे करू शकता. ही संधी एका व्यक्तीला काही वर्षांतच करोडपती बनवणारी आहे. या कामामध्ये उमेदवाराला टेस्लाकडून ४८ डॉलर तेही प्रति तास मिळणार आहे. एकंदरीत, टेस्ला ४,००० रुपये प्रति तास उमेदवाराला त्याच्या कामासाठी देणार आहे.
जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे एलोन मास्क यांच्या टेस्ला कंपनीने या भरती प्रक्रियेस सुरुवात केली आहे. टेस्ला सध्या ह्युमनॉइड रोबोट डेव्हलप करत आहे. या रोबोटचा वापर टेस्ला भविष्यामध्ये त्यांच्या कंपनीतील कामांसाठी करणार आहे. या रोबोटच्या साहाय्याने कंपनीला महत्वाची माहिती साठवण्यात मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या रोबोटला ट्रेनिंग देण्यासाठी काही उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासंदर्भात भरती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
एकंदरीत, निवडीत उमेदवाराला त्या ह्युमनॉइड रोबोटचे प्रशिक्षक म्हणून काम करावे लागणार आहे. या पदाला ‘डाटा कलेक्शन ऑपरेटर’ म्हणून ओळखले जाते. हे सगळे रोबोट्स AI या आधुनिक तंत्रज्ञानाच्या नियंत्रणाखाली असणार आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम ‘डाटा कलेक्शन ऑपरेटर’ याचे असणार आहे. या पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवाराला मोशन कॅप्चार सूट तसेच VR हेडसेट दिले जाईल, त्यांच्यामार्फत रोबोटला ट्रेनिंग द्यावी लागेल.
२०२१ साली एलोन मस्कने पहिल्यांदा ऑप्टिमस या रोबोटची गोष्ट मांडली होती. त्यांना एक अशा रोबोटची गरज होती, जो फॅक्ट्रीमधील सगळी कामे करू शकेल. अशा रोबोटच्या निर्मितीसाठी टेस्ला गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना यश मिळताना दिसून येत आहे. मध्यंतरी, कंपनीतील अनेक लोकं त्या रोबोटला कपडे परिधान करण्याची पद्धत शिकवत असण्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.
हे देखील वाचा : ISRO मध्ये मिळणार हाय सॅलरी पॅकेज; १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी
या पदासाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांनी कंपनीच्या करिअर पृष्ठाला भेट द्या. तेथे डेटा कलेक्शन ऑपरेटर या टॅबवर क्लिक करा. आवश्यक ती माहिती भरून आपल्या रिज्युमेसह अर्ज सबमिट करा. अशा पद्धतीने अर्ज करता येऊ शकते. सोशल मीडियावर टेस्लाच्या या जाहिरातीची प्रचंड चर्चा होत आहे.