
Image
आजच्या टेक इंडस्ट्रीमध्ये फॉरवर्ड डिप्लॉयड इंजिनिअरिंग हे पद अत्यंत वेगाने पुढे येत आहे. या पदावरील इंजिनिअर तंत्रज्ञान आणि व्यवसाय यांच्यात एक भक्कम दुवा म्हणून काम करतात. ते थेट क्लायंटसोबत काम करून बिझनेसच्या समस्या सोडवण्यासाठी एआय टूल्स प्रत्यक्ष लागू करतात. अहवालानुसार, आगामी काळात अशा प्रोफेशनल्सची मागणी आणखी वाढणार असून, या क्षेत्रात काम करणाऱ्या ८० टक्के इंजिनिअर्सना ४० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळत आहे.
याशिवाय, एआय आणि मशीन लर्निंग इंजिनिअर्स स्मार्ट अल्गोरिदम तयार करतात, ज्यामुळे मशिन डेटाच्या आधारे मानवासारखे निर्णय घेऊ शकतात. बाजारात एआय प्रोफेशनल्सची मोठी मागणी असून उपलब्ध टॅलेंटच्या तुलनेत रिक्त जागा जास्त असल्याने या क्षेत्रात पगारात मोठी वाढ झाली आहे.
या यादीत क्लाउड आर्किटेक्ट आणि डेटा इंजिनिअर्सचे स्थानही महत्त्वाचे आहे. क्लाउड आर्किटेक्ट्सचे काम अशा डिजिटल प्रणाली तयार करण्याचे असते, ज्यामुळे लाखो युजर्स एकाच वेळी ॲपवर आले तरी यंत्रणा क्रॅश न होता सुरळीत चालेल. तसेच, डेटा इंजिनिअर्स बॅकएंडला मजबूत डेटा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतात, ज्याच्या विश्लेषणावरून कंपन्या मार्केट ट्रेंड समजून घेतात.
दुसरीकडे, डिजिटल जगाचा विस्तार होत असताना डेटा चोरीचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटी आणि ब्लॉकचेन इंजिनिअर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. नेटवर्कचे रक्षण करणाऱ्या आणि डेटा सुरक्षित ठेवणाऱ्या या भूमिकांसाठी कंपन्या मोठ्या प्रमाणावर भरती करत आहेत.
Ans: एआय युगात फॉरवर्ड डिप्लॉइड इंजिनिअर्स, एआय आणि मशीन लर्निंग इंजिनिअर्स, क्लाउड आर्किटेक्ट्स, डेटा इंजिनिअर्स आणि सायबर सिक्युरिटी इंजिनिअर्सना सर्वाधिक मागणी आहे.
Ans: हे इंजिनिअर्स तंत्रज्ञान आणि व्यवसाय यांच्यात दुवा म्हणून काम करतात आणि क्लायंटच्या समस्येचे निवारण करण्यासाठी थेट एआय टूल्स लागू करतात.
Ans: या क्षेत्रातील अनुभवी प्रोफेशनल्सना सध्या ४० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतचे आकर्षक वार्षिक पॅकेज मिळत आहे.