फोटो सौजन्य- सोशल मीडिया
How to Use AI: देशातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये नीट जेईई आणि यूपीएससीची गणना केली जाते. या परीक्षा पास करण्यासाठी लाखो तरुण दिवस रात्र एक करतात. पूर्वी या परीक्षांचा अर्थ हा वेगळा होता मात्र आता एआयच्या युगात हे सर्व वेगाने बदलत आहे. एआय शिक्षण घेण्याच्या, समजून घेण्याच्या आणि कुमकुवतपणा ओळखून त्यात सुधारणा करण्याच्या पद्धतीला नव्याने आकार देत आहे.
एआय अँड बियॉन्डचे को फाउंडर जसप्रित ब्रिंद्रा यांचे मत आहे की एआय ही विद्यार्थ्यांची तयारी अचूक आणि प्रभावी बनवणारी एक स्मार्ट जोडीदार आहे. त्यामुळे कष्टाची जागा कोणी घेऊ शकत नाही, तर सातत्यपूर्ण अभ्यास संकल्पना स्पष्ट असणे आणि दबावातील योग्य घेण्याच्या क्षमतेमुळे मिळते.
एआयने शाळा-कॉलेजेसपासून ते प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांपर्यंतची तयारी सोपी केली आहे. आता मुले एआयच्या सहाय्याने नीट, जेईई आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहेत. यामुळे महागड्या कोचिंगचा खर्च वाचत आहे आणि वेळेचीही बचत होत आहे.
कोचिंग सेंटरमध्ये एकाच क्लासरुममध्ये २०० विद्यार्थी बसतात. शिक्षक सर्वांना एकाच स्पीडने शिकवतात. पण प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची क्षमता आणि वेग वेगवेगळा असतो. एआय-बेस्ड लर्निंग सिस्टम प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता, गुण आणि कमकुवतपणाचे खोलवर विश्लेषण करतात. जर एखादा विद्यार्थी जेईईमध्ये ऑरगॅनिक केमिस्ट्री किंवा फिजिक्सच्या एखाद्या न्यूमेरिकलमध्ये अडकत असेल, तर एआय त्याला त्याच विषयानुसार कस्टमाइज्ड स्पष्टीकरण आणि सरावासाठी प्रश्न उपलब्ध करून देते.
अनेकदा विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजचा निकाल आल्यावर किंवा शिक्षकांकडून रिव्ह्यू मिळाल्यानंतरच आपल्या चुकांची जाणीव होते. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) तयार केलेल्या मॉक टेस्ट विद्यार्थ्यांच्या प्रत्येक उत्तरासोबत जुळवून घेतात. जर विद्यार्थ्याने एखादा प्रश्न चुकीचा सोडवला, तर एआय लगेच त्याचे कारण स्पष्ट करते. यामुळे टाइम मॅनेजमेंटमध्ये सुधारणा होत आहे. हा रिअल-टाइम फीडबॅक विद्यार्थ्यांसाठी गेमचेंजर ठरत आहे.
भारतात वर्षानुवर्षे दर्जेदार कोचिंगचे वर्चस्व कोटा, दिल्ली किंवा हैदराबादसारख्या निवडक शहरांपुरतेच मर्यादित होते. गावखेड्यातील किंवा छोट्या शहरांमधील मुले अवाजवी फी आणि राहण्याच्या खर्चामुळे मागे पडत असत. एआय टूल्स बहुभाषिक आणि संभाषणात्मक शैलीत उपलब्ध आहेत. यामुळे तयारीसाठी इतर शहरांमध्ये राहण्याचा ताण संपला आहे. आता गावातील मुलगाही अत्यंत कमी खर्चात एआयच्या मदतीने नीट, जेईई आणि यूपीएससीची तयारी करू शकतो.
एआय वापरण्याची पद्धत प्रत्येक परीक्षेच्या स्वरूपाळानुसार बदलते:
नीट आणि जेईई: येथे एआय पर्सनलाइज्ड प्रश्न बँक, संकल्पना सिमुलेशन आणि स्पीड-अक्युरसी ॲनालिटिक्समध्ये सर्वाधिक मदत करते.
यूपीएससी: नागरी सेवांच्या तयारीत अभ्यासक्रम, भरपूर डेटा वर्गीकरण, चालू घडामोडींचा सारांश तयार करणे आणि निबंध लेखनासाठी तार्किक युक्तिवाद तयार करण्यात एआय अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
यूपीएससी नागरी सेवासारख्या परीक्षांमध्ये केवळ फॅक्ट्स लक्षात ठेवणे पुरेसे नसते. यामध्ये यशस्वी होण्यासाठी विविध दृष्टिकोनांचे महत्त्वपूर्ण मूल्यमापन करणे आवश्यक असते. तसेच स्वतःहून योग्य निर्णय घेण्याची क्षमताही असायला हवी. हे कौशल्य केवळ मानवी मेंदूजवळ असते. एआय हे अभ्यासाचे केवळ एक साधन आहे, मालक नाही. विचार न करता एआयच्या उत्तरांवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे कि एआय कधीकधी चुकीचे किंवा दिशाभूल करणारे तथ्य देखील देऊ शकते.
भविष्यातील परीक्षांमध्ये केवळ तपशील लक्षात ठेवणे यशाची हमी असणार नाही, कारण माहिती तर एका क्लिकवर उपलब्ध असते. खरा फरक यावरून ठररेल की कोणता उमेदवार चांगले प्रश्न विचारू शकतो, आपल्या क्रिटिकल थिंकिंगचा वापर करतो आणि परीक्षा हॉलमधील ताणतणाव कसा हाताळतो. एआय तुमचे कष्ट कमी करत नाही, तर वेळेचा योग्य वापर सुनिश्चित करते.
Ans: एआय विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार 'पर्सनललाइज्ड लर्निंग', इन्स्टंट फीडबॅक, अडॅप्टिव्ह मॉक टेस्ट आणि अभ्यासक्रमाचे अचूक विश्लेषण करून वेळ वाचवण्यास मदत करते.
Ans: बहुभाषिक आणि संभाषणात्मक एआय टूल्समुळे विद्यार्थ्यांना कोटा किंवा दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन महागडे कोचिंग घेण्याची गरज उरलेली नाही.
Ans: नीट-जेईईसाठी एआय प्रश्न बँक व सिमुलेशनमध्ये मदत करते, तर यूपीएससीसाठी चालू घडामोडींचा सारांश आणि निबंध लेखनाचे युक्तिवाद तयार करण्यात उपयुक्त ठरते.






