
Image
Free Coaching in Nanded: महाराष्ट्राच्या नांदेड जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांत पडत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक टंचाई लक्षात घेऊन, जिल्हा प्रशासनाने ग्रामीण कुटुंबातील २०० गुणवंत विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी मोफत कोचिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत पात्र विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा जसे की NEET, JEE, MHT-CET ची मोफत आणि सुव्यवस्थित तयारी करून घेतली जाईल. आर्थिक अडचण किंवा खालावलेली आर्थिक स्थिती कोणत्याही प्रतिभावान विद्यार्थ्याला उच्च शिक्षण घेण्यापासून रोखू नये, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
या मोफत कोचिंगचा लाभ घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. ही योजना प्रामुख्याने ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी आहे. तसेच सध्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, हायस्कूल आणि शासनाकडून अनुदानित असलेल्या खासगी शाळांमध्ये इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी यासाठी पात्र असतील. या विशेष कार्यक्रमासाठी एकूण २०० गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
Top 6 Skills for Success: फक्त पदवी पुरेशी नाही! ‘या’ ६ महत्त्वाच्या कौशल्याने कमवा बक्कळ पैसा
जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, या कोचिंग कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड एका प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून केली जाईल. ही निवड परीक्षा डिसेंबर महिन्यात आयोजित केली जाईल. तसेच ही परीक्षा पास करणाऱ्या २०० निवडक विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांकडून मेडिकल, इंजिनिअरिंग आणि इतर प्रोग्राम्ससाठी तयारी करून घेतली जाईल. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
साधारणपणे सधन कुटुंबातील विद्यार्थी या कठीण स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी लाखो रुपयांची फी भरून मोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूट्सचा आधार घेतात, तर ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील मुले पैशांअभावी या स्पर्धेत मागे पडतात. अशातच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या नांदेड जिल्ह्यात प्रशासनाचा हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे, जेणेकरून ते देशातील टॉप टेक्निकल आणि मेडिकल इन्स्टिट्यूट्समध्ये प्रवेश मिळवू शकतील.
Ans: ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, शासकीय व अनुदानित शाळांमध्ये सध्या इयत्ता १० वीत शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
Ans: प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून एकूण २०० गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
Ans: या कोचिंग कार्यक्रमातील प्रवेशासाठी निवड परीक्षा डिसेंबर महिन्यात आयोजित केली जाईल.