
Image
Maharashtra School Textbooks Revision: राज्यातील शालेय पुस्तकांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्याचे पाठ्यपुस्तक मंडळ ‘बालभारती’कडून याच शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ६ वीची इतिहास, भूगोल आणि विज्ञानाची नवीन पाठ्यपुस्तके सादर करण्यात आली आहेत. या नवीन पुस्तकांमध्ये प्राचीन भारतीय ज्ञानग्रंथ, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक विद्वानांना प्रमुखतेने स्थान देण्यात आले आहे. तसेच इतिहासाच्या काही सामाजिक आणि राजकीय घटकांच्या मांडणीत बदल करण्यात आले आहेत. एनसीईआरटीच्या (NCERT) धर्तीवर केलेल्या या बदलांतर्गत पुस्तकांमध्ये प्रामुख्याने तीन दिशांवर आणि इतिहासाच्या काही भागांमधील बदलांवर काम करण्यात आले आहे.
विज्ञानाच्या नवीन पुस्तकांमध्ये आधुनिक वैज्ञानिक सिद्धांतांसोबतच प्राचीन भारतीय विद्वानांच्या योगदानाचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ‘फोर्स अँड प्रेशर’ (Force and Pressure) या धड्यात गुरुत्वाकर्षणाच्या चर्चेदरम्यान आयझॅक न्यूटनसोबतच भास्कराचार्य २ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. पुस्तकानुसार, भास्कराचार्य २ यांनी सुमारे ९५० वर्षांपूर्वी त्यांच्या ‘सिद्धांत शिरोमणी’ या ग्रंथात पृथ्वी वस्तूंना आपल्याकडे आकर्षित करते हे स्पष्ट केले होते. तसेच ‘बियॉन्ड द स्काय’ या धड्यात एका विशेष बॉक्सच्या माध्यमातून आर्यभट्ट हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे समजावून सांगितले होते, अशी माहिती दिली आहे.
याव्यतिरिक्त महर्षि चरक यांना आयुर्वेदाचे संस्थापक मानत सजीवांच्या वर्गीकरणातील त्यांचे योगदान समाविष्ट केले गेले आहे. तसेच अंतराळ संशोधनातील भारताच्या उपलब्धी दर्शवताना चंद्रयान-१, मंगलयान, चंद्रयान-३, आदित्य एल-१ आणि निसार उपग्रहांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ‘वेदर वमन ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हवामानशास्त्रज्ञ अण्णा मणी आणि पर्यावरण संरक्षणातील ‘चिपको आंदोलना’त गौरा देवी यांच्या योगदानाचाही नवीन पुस्तकांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
भूगोलाच्या नवीन पुस्तकात भारतीय भौगोलिक इतिहासाला स्थान देण्यात आले आहे. यात भारतीय भूगोलाच्या इतिहासावरील एका नवीन सेक्शनमध्ये वेद, पुराण, उपनिषदे आणि सूर्य सिद्धांताचा संदर्भ देण्यात आला आहे. यामध्ये पृथ्वीचे वर्णन ‘सप्तद्वीप’ म्हणून करताना ब्रह्मांडाच्या उत्पत्तीच्या वैदिक विचारांची तुलना ‘बिग बँक सिद्धांताशी’ करण्यात आली आहे.
पूर्वीच्या पुस्तकांमध्ये केवळ ग्रीनिच मध्यरेखेचा उल्लेख होता, परंतु आता नवीन पुस्तकात प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी उज्जैनला पृथ्वीचा केंद्रबिंदू मानले होते आणि पहिल्यांदा मूळ रेखांशाची (Base Longitude) संकल्पना दिली होती, हे स्पष्ट करण्यात आले आहे.
Top 6 Skills for Success: फक्त पदवी पुरेशी नाही! ‘या’ ६ महत्त्वाच्या कौशल्याने कमवा बक्कळ पैसा
इतिहासाच्या पुस्तकात प्राचीन वैद्यकशास्त्र, प्रमुख ऐतिहासिक व्यक्ती आणि सामाजिक-राजकीय मुद्द्यांच्या वर्णनात बदल करण्यात आले आहेत. यामध्ये ‘फादर ऑफ सर्जरी’ मानल्या जाणाऱ्या सुश्रुत यांच्या नाक पुनर्रचना (Nose Reconstruction) तंत्राचा आणि ‘सुश्रुत संहिता’ या ग्रंथाचा सविस्तर उल्लेख आहे. तसेच चाणक्य यांचे ‘अर्थशास्त्र’ आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्या उत्थानातील त्यांची भूमिका सविस्तरपणे जोडली गेली आहे.
पूर्वीच्या पुस्तकांमध्ये वर्णव्यवस्था आणि जातीय विषमतेच्या विकासाचा सविस्तर उल्लेख होता. याशिवाय उत्तर वैदिक काळात यज्ञाचे विधी आणि पुरोहित वर्गाच्या विशेषाधिकारांशी संबंधित तो परिच्छेद हटवण्यात आला आहे, ज्यामध्ये सामाजिक स्थान हे जन्मावर आधारित असल्याचे म्हटले गेले होते. याऐवजी आता वैदिक मूल्ये, नैतिक कर्तव्ये आणि निसर्ग पूजेवर भर देण्यात आला आहे.
MPSC Bank मध्ये ‘या’ पदांसाठी भरती जाहीर; अर्ज प्रक्रिया आणि अंतिम मुदत पहा एका क्लिकवर..
तसेच वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या शिकवणी कायम ठेवल्या गेल्या आहेत, परंतु ईसवीसन पूर्व सहाव्या शतकात नवीन धर्मांच्या उदयाला जातीय भेदभाव आणि सामाजिक परिस्थितीशी जोडणारा जुना परिच्छेद हटवून, त्याला भारताची ‘धार्मिक विविधता’ म्हणून मांडण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाच्या कारणांमधून ‘परदेशी टोळ्यांचे आक्रमण’ हा मुद्दा पूर्णपणे हटवण्यात आला आहे. आता या ऱ्हासासाठी नदीच्या पात्रातील बदल, नैसर्गिक आपत्ती आणि सुमेरियन संस्कृतीसोबतच्या व्यापारातील घसरण या कारणांचाच समावेश करण्यात आला आहे.
Ans: हे बदल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) आणि एनसीईआरटीच्या (NCERT) धर्तीवर करण्यात आले आहेत.
Ans: बालभारतीकडून याच सत्रापासून इयत्ता ६ वीच्या इतिहास, भूगोल आणि विज्ञान या नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये हे बदल सादर करण्यात आले आहेत.
Ans: विज्ञानाच्या पुस्तकात न्यूटनसोबत भास्कराचार्य २ (गुरुत्वाकर्षण), आर्यभट्ट (पृथ्वी सूर्याभोवती फिरते), महर्षि चरक आणि अंतराळ संशोधनातील भारताच्या उपलब्धींचा समावेश केला आहे.