Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Army Chief: वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भूषवणार लष्कराचे सर्वोच्च पद! कोण आहेत भारताचे नवे लष्करप्रमुख?

New Army Chief Dheeraj Seth: भारताचे ३१ वे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ ३० जून २०२६ रोजी पदभार स्वीकारणार आहेत. वाचा त्यांचा थक्क करणारा लष्करी प्रवास.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 15, 2026 | 11:41 AM
धीरज सेठ

धीरज सेठ

Follow Us
Follow Us:

New Army Chief Dheeraj Seth: देशाला लवकरच नवे लष्करप्रमुख (Army Chief) मिळणार आहेत. जनरल उपेंद्र द्विवेदी ३० जून २०२६ रोजी आपला कार्यकाळ पूर्ण करून निवृत्त होत असून त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते देशाचे ४९ वे उप-लष्करप्रमुख (Vice Chief of Army Staff) म्हणून कार्यरत असून, ३० जून रोजी ते ३१ वे लष्करप्रमुख म्हणून भारतीय सैन्याची कमान हाती घेतील. विशेष म्हणजे, त्यांचा हा कार्यकाळ ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत असणार आहे. यानिमित्ताने PVSM, UYSM आणि AVSM यांसारख्या मोठ्या लष्करी सन्मानांनी गौरवल्या गेलेल्या धीरज सेठ यांचा शिक्षणापासून ते लष्करप्रमुख पदापर्यंतचा प्रवास जाणून घेऊया.

शिक्षणापासून ते फौजमधील प्रवासापर्यंत

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी देशातील अनेक नामांकित आणि प्रतिष्ठित लष्करी संस्थांमधून शिक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला, इंडियन मिलिट्री अकॅडमी डेहराडून, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन, आर्मी वॉर कॉलेज महू ,नॅशनल डिफेन्स कॉलेज नवी दिल्ली सारख्या शैक्षणिक संस्थांचा समावेश होतो. २० डिसेंबर १९८६ रोजी ‘आर्म्ड कोर’ (Armoured Corps) मध्ये कमिशन मिळाल्यापासून आतापर्यंत त्यांनी भारतीय सैन्यात जवळपास चार दशके (४० वर्षे) सेवा बजावली आहे.

Marine Insurance Rules: ओमानच्या समुद्रात भारतीय जहाज बुडालं! मालकाला विम्याचे पैसे कसे मिळणार? जाणून घ्या एका क्लिकवर

विविध आघाड्यांवर महत्त्वपूर्ण कामगिरी

आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी डेझर्ट सेक्टरमध्ये आर्म्ड रेजिमेंटचे नेतृत्व केले आहे. तसेच त्यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये (Counter-Insurgency Operations) सक्रिय सहभाग नोंदवला असून अंगोला देशातील संयुक्त राष्ट्रांच्या (UN) शांतता मोहिमेत ‘ऑपरेशन ऑफिसर’ म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. या संपूर्ण प्रवासात त्यांनी कमांड, स्टाफ आणि ट्रेनिंग या तिन्ही आघाड्यांवरील अत्यंत महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

वडिलांचा वारसा आणि सर्वोच्च लष्करी सन्मान

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांचे भारतीय लष्कराशी असलेले नाते नवीन नाही, तर हा त्यांच्या घराण्याचाच परंपरागत वारसा आहे. त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल कृष्ण मोहन सेठ हे देखील भारतीय सैन्यात उच्च पदावर कार्यरत होते आणि १९९७ मध्ये ‘अ‍ॅडज्युटंट जनरल’ (Adjutant General) पदावरून निवृत्त झाले होते. देशासाठी बजावलेल्या उत्कृष्ट आणि शौर्यपूर्ण सेवेसाठी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांना देशाच्या सर्वोच्च लष्करी पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. ३० जून रोजी ३१ वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कर आधुनिकता आणि सुरक्षेच्या नव्या शिखरांवर पोहोचेल यात शंका नाही.

AI in Education: चॅटजीपीटीमुळे अभ्यास सोपा झाला पण त्याच्या अतिवापरावर शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली ‘ही’ मोठी चिंता!

Web Title: General dheeraj seth new army chief career profile marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • indian army
  • New Army Chief

संबंधित बातम्या

Major Navya Shekhawat: कोण आहेत मेजर नव्या शेखावत? राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला अधिकारी ADC
1

Major Navya Shekhawat: कोण आहेत मेजर नव्या शेखावत? राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला अधिकारी ADC

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांची निवड कशी होते? जाणून घ्या कोणत्या ३ समुदायांचे जवानच बनतात President’s Bodyguard?
2

राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांची निवड कशी होते? जाणून घ्या कोणत्या ३ समुदायांचे जवानच बनतात President’s Bodyguard?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.