Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूगाेल पेपर चाेरीला; बुधवारचा पेपर नियाेजित वेळेत हाेणार, SSC बोर्डाचा मोठा निर्णय

भूगोलाचा पेपर नियोजित वेळेत होणार असून या विषयाची प्रश्नपत्रिका कुठेही व्हायरल झालेली नाही असे राज्यमंडळाने सांगितले आहे. दहावीच्या परीक्षा सुरू असून भूगोलाच्या पेपरबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 17, 2026 | 11:19 PM
भूगोलाचा पेपर वेळेप्रमाणे नियोजित घेण्यात येणार (फोटो सौजन्य - iStock)

भूगोलाचा पेपर वेळेप्रमाणे नियोजित घेण्यात येणार (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका कुठेही व्हायरल झाली  नाही
  • भूगोल विषयाचा पेपर नियोजित वेळेत होणार असल्याचे राज्य मंडळाने सांगितल
  • या प्रकरणी परीक्षा केंद्र प्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी यांना निलंबित
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्कः सांगोला येथील विद्यामंदिर प्रशालेतील परीक्षा केंद्राची  ‘स्ट्राँग रूम’ फोडून एका विद्यार्थ्याने इयत्ता दहावीच्या भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका चोरल्याचे मंगळवारी उघडकीस आले. मात्र, संबंधित भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका कुठेही व्हायरल झाली नसल्याने  बुधवारी भूगोल विषयाचा पेपर नियोजित वेळेत होणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने संबंधित परीक्षा केंद्र प्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कठोर कारवाई केल्याने आता पूर्वनियोजित वेळेप्रमाणेच भूगोलाचा पेपर घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

राज्यात दहावी-बारावी परीक्षेत कॉपीप्रकरणी 81 कर्मचारी निलंबित; बारावीच्या परीक्षेत 233 गैरप्रकार, तर दहावीच्या…

भूगोल पेपर नियोजित वेळेप्रमाणे 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीची परीक्षा घेतली जात असून बुधवारी भूगोलाचा पेपर नियोजित वेळेत होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सोलापूर जिल्ह्यात एका केंद्रावर स्ट्रॉंग रूम फोडून प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याचे समोर आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली हाेती. प्रश्नपत्रिका चोरीला गेल्यामुळे बुधवारी होणारा भूगोलाचा पेपर रद्द होणार की नियोजित वेळेत घेतला जाणार ? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, हा पेपर नियोजित वेळेत होणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. यामुळे दहावीच्या मुलांना नक्कीच दिलासा मिळाला आहे. सध्या अनेक ठिकाणी पेपरफुटीचे प्रकार सर्रास आढळून येतात. मात्र यावर त्वरीत कारवाई करण्यात आली असल्याने अन्य ठिकाणी अशा प्रकारांना आळा बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

प्रश्नपत्रिका फुटल्याने संभ्रम

दरम्यान, सांगोल्यातील परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समजल्यानंतर पुणे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी घटनास्थळी भेट दिली. केलेल्या पाहणीमध्ये त्यांना संबंधित परीक्षा केंद्रातील स्ट्रॉंग रूमवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे आढळून आले. मात्र, संबंधित शाळा ही रस्त्यालगत असल्याने जवळील एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक विद्यार्थी प्रश्नपत्रिका घेऊन जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलीस पथक संबंधित विद्यार्थ्यांचा तपास करत आहेत. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरे नसताना स्ट्रॉंग रूम मध्ये प्रश्नपत्रिका ठेवल्या प्रकरणी संबंधित केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले

10th Board Exam : दहावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; परीक्षा केंद्राच्या अर्धा किमीवरील झेरॉक्स दुकानं बंद

Web Title: Geography paper stolen and leaked wednesday exam to proceed as scheduled major decision by ssc board

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 11:19 PM

Topics:  

  • Paper Leak Case
  • SSC Board
  • SSC Examination

संबंधित बातम्या

दहावीच्या प्रश्नपत्रिकेची चोरी! केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी निलंबित : पेपर नियोजित वेळेत
1

दहावीच्या प्रश्नपत्रिकेची चोरी! केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी निलंबित : पेपर नियोजित वेळेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.