SSC Paper Leak : शिक्षण मंडळाच्या कॉपीमुक्त अभियानाचे तीन तेरा; दहावीच्या परिक्षेचा पहिलाच पेपर फुटला
दहावीचा मराठीचा पेपर फुटला, उत्तरप्रतिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्यापहिल्याच दिवशी दहावीच्या मराठी पेपर फुटीला ग्रहण लागलेलं आहे. जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. जालना जिल्ह्यातील बदानापूर येथे दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात आहेत. त्यामुळे आता खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने काही दिवसांपुर्वी कॉपीमुक्त परिक्षा अभियानाबाबत राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. राज्यातील सर्वच शाळा या अभियानात सहभागी झाल्या होत्या. मात्र याबाबत राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ अपयशी झाल्याचं दिसून आलं आहे. दहावीच्या परिक्षेला आजपासून सुरुवात झाली असून परिक्षेचा पहिलाच पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेपर सुरु झाल्याच्या नंतर काही मिनिटातच ही घटमा समोर आली. सदर विषयाच्या उत्तरपत्रिकांच्या प्रिंट विद्यार्थ्यांना आधीच दिल्याची बाब उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे.जालन्यात झालेल्या या धक्कायक प्रकारावर शिक्षण मंडळ काय भूमिका घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.
बोर्डाच्या परिक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणामध्ये सुरळीत पार पाडण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने संपूर्ण तयारी केली होती. याबाबत मुख्यमंत्री.देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीव्दारे झालेल्या विशेष बैठकीत परीक्षा काळात कोणताही गैरप्रकार घडणार नाही याबाबत सूचना करीत निर्देश दिले होते..विदयार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेच्या 1 तास आधी आपापल्या परीक्षा केंद्रांवर हॉल तिकीटासह उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी. सोबत शक्य झाल्यास ओळखपत्रही ठेवावे. परीक्षा कॉपीमुक्त पारदर्शक रितीने पार पडतील याची काळजी घेऊन परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले होते. .या कालावधीत कुठेही गैरप्रकार आढळल्यास अथवा तक्रार करावयाची असल्यास शिक्षण विभागाच्या उपायुक्तांशी संपर्क साधावा असंही सांगण्यात आलं होतं.
ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळून येतील त्या केंद्राची मान्यता कायमची रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. दोषी आढळणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले होते.. 12 वीच्या परीक्षांप्रमाणेच 10 वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा कालावधीतही ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात आले होते. मात्र जालन्यात झालेल्या धक्कादायक प्रकारामुळे आता शिक्षण मंडळ काय भूमिका घेणार याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.