फोटो सौजन्य - Social Media
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI)मध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली होती. अनेकांनी या संधीचा लाभ घेत नियुक्तीच्या प्रक्रियेत सहभागही घेतला आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात घ्यावे की UIDAI च्या या भरतीसाठी फक्त ४ दिवसांचा कालावधी उरला आहे. यानंतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. त्यामुळे इच्छुक असाल तर वेळ न दवडता अधिसूचना वाचून काढा आणि भरतीला सुरुवात करा. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
या भरतीच्या माध्यमातून फक्त ८ निकामी जागा भरण्यात येणार आहेत, ३० जूनपर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी जास्तीत जास्त आयु ५६ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. एकदंरीत, आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयो मर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना ३५,००० रुपये दरमाह वेतन ते १,१२,४०० रुपये दरमाह वेतन मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज
या भरती संदर्भात अधिक माहिती जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आला आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार असून, ३० तारीख शेवटची तारीख असल्याने उमेदवारांना त्या अगोदर अर्ज करावा लागणार आहे. तसेच इतर पात्रता निकषांना ( जे अधिसूचनेमध्ये देण्यात आले आहेत) फॉलो आणि पात्र करत उमेदवारांना या भरतीसाठी नियुक्त होता येणार आहे.