Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Higher Education Fee Hike: इंजिनिअरिंग-मेडिकलच्या फीवाढीवर ब्रेक लागणार? मंत्री चंद्रकांत पाटलांचे महत्त्वाचे विधान

Higher Education Fee Hike Demand: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे इंजिनिअरिंग, मेडिकल व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्कवाढीला एक वर्ष स्थगिती देण्याची मागणी पुढे आली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 23, 2026 | 03:47 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकरी बांधवांचे अर्थिक परिस्थिती ढासळली
  • शुल्क नियामक प्राधिकरणाकडे  (एफआरए) असणाऱ्या प्रस्तावावर सरकारने निश्चित करावी
  • शैक्षणिक शुल्कात कोणतीही वाढ होऊ नये
Higher Education Fee Hike Demand: राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकरी बांधवांचे अर्थिक परिस्थिती ढासळली आहे. अशा वेळी राज्यात उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा शुल्कात माफी देणे पुरेसे नसून इंजनिअरिंग, मेडिकल फार्मसी, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट आणि अन्य व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्कवाढीला एक वर्ष स्थगिती देऊन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये लागू असलेले शुल्क पुढील वर्षी कायम ठेवावे अशी मागणी समोर आली आहे.

अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट आणि विविध मेडिकल अभ्यासक्रमांसह संबंधित व्यवसायिक अभ्याक्रमात शुल्क निश्चितीची जबाबदारी शुल्क नियामक प्राधिकरणाकडे  (एफआरए) आहे. महाविद्यालयांकडून त्यांच्या खर्चाचे आणि शुल्कवाढीचे प्रस्ताव मागवले जातात. त्यानंतर संबधित निकषांच्या आधारे निश्चित केले जाते. मात्र दर वर्षी शुल्कवाढीची प्रक्रिया राबवताना सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचाही विचार होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक क्षमता आणि त्यांच्यावर पडणारा अतिरिक्त भार यांचाही विचार झाला पाहिजे.

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी! Project Administrative Assistant पदासाठी थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

शुल्कात कोणतीही वाढ होऊ नये

दुष्काळी परिस्थितीत पालकांच्या उत्पन्नात होताना शुल्कावाढीचा भार विद्यार्थ्यांवर टाकणे शिक्षणाच्या दृष्टीने अडचणीचे ठरू शकते. दरम्यान पारंपरिक अभ्यासक्रमाचे शुल्क कमी असले तरी राज्यभरातील नव्याने सुरू झालेल्या अभ्यासक्रमांचे शुल्क अधिक आहे. या शुल्कात कोणत्याही प्रकारची वाढ होऊ नये, अशी मागणी पुढे आली आहे.

दरम्यान राज्य सरकारकडून मुलींना शिक्षण आणि परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत आहे, मागासवर्गीय प्रवर्गातील मुलांचे निम्मे शुल्कही सरकार भरते तर राखीव प्रवर्गातील मुलांना शुल्क भरावे लागत नाही. अशा परिस्थितीत पूर्ण शुल्क खूप कमी विद्यार्थ्यांना भरावे लागते. मात्र एक वेळ विशेष बाब म्हणून पुढील वर्षीच्या शुल्कवाढीला स्थगिती देण्यबाबत विचार करता येईल, असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

IITian Pranita Pujari Apple Job: ॲपलला राम राम ठोकला! मायग्रेनच्या त्रासाला कंटाळून तरुणीने सुरू केला ‘हा’ नवा स्टार्टअप

शुल्क नियामक प्राधिकरणाकडे  (एफआरए) असणाऱ्या प्रस्तावावर सरकारने निश्चित करावी

एफआरएने शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी शुल्कनिश्चितीच्या प्रक्रियेत महाविद्यालयाकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. हे प्रस्ताव ३१ ऑक्टोबर सादर करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शुल्कवाढीचा निर्णय हा दुष्काळी परिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन आपली भूमीका स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे, सरकारने एफआरएशी चर्चा करून पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुल्कवाढ न करण्याबाबत योग्य ते धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. सध्याचे शुल्क २०२७-२८ मध्येही कायम ठेवल्यास विद्यार्थ्यांच्या पालकांना शुल्कवाढीचा जास्त भार सहन करावा लागणार नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शुल्क निश्चितीची जबाबदारी कोणाकडे असते?

    Ans: व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शुल्क निश्चितीची जबाबदारी शुल्क नियामक प्राधिकरणाकडे (FRA) असते.

  • Que: शुल्कवाढीसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटले आहे?

    Ans: एक वेळ विशेष बाब म्हणून पुढील वर्षीच्या शुल्कवाढीला स्थगिती देण्याबाबत विचार करता येईल, असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

  • Que: शुल्क नियामक प्राधिकरणाकडे (FRA) प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत कोणती आहे?

    Ans: शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी शुल्कनिश्चिती प्रक्रियेत महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागवण्यात आले असून, ती सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर आहे.

Web Title: Higher education fee hike drought situation maharashtra marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • chandraknt patil
  • education

संबंधित बातम्या

UGC-NET 2026 परीक्षा ‘या’ दिवशी सुरू होणार? NTA ने परीक्षा केंद्रावर ‘या’ गोष्टी नेण्याबाबत दिले महत्त्वाचे निर्देश!
1

UGC-NET 2026 परीक्षा ‘या’ दिवशी सुरू होणार? NTA ने परीक्षा केंद्रावर ‘या’ गोष्टी नेण्याबाबत दिले महत्त्वाचे निर्देश!

CA Inter Topper Sakshi Chandak: नाशिकच्या लेकीचा देशात डंका! साक्षी चंडाकच्या यशाचा फॉर्मुला पहा एका क्लिकवर..
2

CA Inter Topper Sakshi Chandak: नाशिकच्या लेकीचा देशात डंका! साक्षी चंडाकच्या यशाचा फॉर्मुला पहा एका क्लिकवर..

MBA without CAT exam: १२ वी नंतर थेट IIM मध्ये प्रवेश! CAT परीक्षेची कटकट संपली; ‘या’ स्टेपद्वारे मिळणार प्रवेश!
3

MBA without CAT exam: १२ वी नंतर थेट IIM मध्ये प्रवेश! CAT परीक्षेची कटकट संपली; ‘या’ स्टेपद्वारे मिळणार प्रवेश!

CA Result 2026 Out: सीए इंटर परीक्षेचा निकाल घोषित! ‘या’ लिंकवर पाहा निकाल
4

CA Result 2026 Out: सीए इंटर परीक्षेचा निकाल घोषित! ‘या’ लिंकवर पाहा निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.