Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंदी भाषेत कुशल आहात? ट्रान्स्लेटर पदासाठी करा अर्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती

हिंदी तसेच इंग्रजी विषयांमध्ये पदवीधर असणाऱ्या उमेदवारांसाठी रोजगारसंबंधित एक महत्वाची बातमी आहे. भारत सरकार नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक संधी घेऊन आला आहे. सरकारने याबाबत एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. कर्म

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 06, 2025 | 05:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

हिंदी तसेच इंग्रजी विषयांमध्ये पदवीधर असणाऱ्या उमेदवारांसाठी रोजगारसंबंधित एक महत्वाची बातमी आहे. भारत सरकार नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक संधी घेऊन आला आहे. सरकारने याबाबत एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. कर्मचारी निवड आयोगाने या भरतीचे आयोजन केले असून उमेदवारांना ssc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असून, इच्छुकांनी खालील माहिती वाचून अर्ज करावा.

Flipkart मध्ये ट्रेनरची वॅकन्सी, ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांनी करा अप्लाय…

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून 2025 आहे, तर ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 27 जून 2025 आहे. अर्जा मध्ये सुधारणा करण्यासाठी 1 ते 2 जुलै 2025 दरम्यान SSC सुधारणा विंडो उपलब्ध करून देणार आहे. पेपर-I म्हणजेच संगणक आधारित परीक्षा 12 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून भारत सरकारच्या मंत्रालये, विभाग व संस्थांमध्ये ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर ऑफिसर, सीनियर ट्रान्सलेटर आणि सब-इन्स्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर) अशा ग्रुप ‘B’ वर्गातील गैर-राजपत्रित पदांवर भरती होणार आहे.

या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याची सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेत देण्यात आली आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ती काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी दोन टप्प्यांत परीक्षा घेतली जाईल. पहिला टप्पा म्हणजे पेपर-I (CBT) आणि दुसरा टप्पा म्हणजे पेपर-II (वर्णनात्मक परीक्षा). पेपर-I च्या गुणांच्या आधारे उमेदवारांची श्रेणीनुसार निवड होईल आणि त्यानंतरच त्यांना पेपर-II मध्ये बसण्याची संधी मिळेल. पेपर-I मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची निगेटिव्ह मार्किंग करण्यात येईल.

आधार की OTR फॉर्म, SSC भरती देण्यासाठी कोणती माहिती असणार वैध, आयोगाने केले स्पष्ट

अर्ज शुल्क सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी ₹100 ठेवण्यात आले आहे, तर महिला उमेदवार, अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग व माजी सैनिक उमेदवारांसाठी शुल्क माफ आहे. शुल्काचे भरणे केवळ BHIM UPI, नेट बँकिंग, VISA, मास्टरकार्ड, Maestro किंवा RuPay डेबिट कार्ड यांचा वापर करून ऑनलाइन पद्धतीनेच करता येईल. अर्जातील सुधारणा करताना देखील याच पद्धतीने शुल्क भरावे लागेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक आणि अधिकृत अधिसूचना दोन्ही SSC च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ssc.gov.in या संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी.

Web Title: Hindi translator recruitment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 05:37 PM

Topics:  

  • Recruitment News

संबंधित बातम्या

Jobs Alert! सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी Special Recruitment
1

Jobs Alert! सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी Special Recruitment

‘ऑफबीट’ क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी! सायबर सुरक्षा आणि एथिकल हॅकिंगमध्ये उच्च पगारासह मोठी मागणी
2

‘ऑफबीट’ क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी! सायबर सुरक्षा आणि एथिकल हॅकिंगमध्ये उच्च पगारासह मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.