फोटो सौजन्य - Social Media
योग्य करिअर आपल्याला योग्य भवितव्य देते. आपलं संपूर्ण भविष्य एका निर्णयावर अवलंबून असतं. पण या महत्वाच्या प्रसंगी अनेक विद्यार्थी चुकतात आणि भवितव्याचा पायाच चुकीचा रचला जातो. ज्याने भवितव्यच ढासळतं. मुळात, एखादा करिअर निवडताना आपल्याकडे संपूर्ण प्लॅन असणे गरजेचे असते. पण ते नसले तर नक्कीच आपण निवडलेल्या क्षेत्रात फार काळ काही टिकत नाही. करिअर निवड करताना फक्त पैसे पाहायला नको, करिअर अशी गोष्ट आहे जी आपण आयुष्यभर जपणार आहोत तर त्या गोष्टीची आवड असणेही तितकेच महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी कौशल्यात वाढ केली पाहिजे. एकाच कौशल्याचा आधार घेणे म्हणजे एकंदरीत स्वतःचेच नुकसान करण्यासारखे आहे. स्वतःची नेटवर्किंग करणे आणि आपण काम कर्त्या क्षेत्रात बऱ्यापैकी ओळख असणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी बरोबर आर्थिक निर्णय घेणे आणि होणाऱ्या चुका टाळणेही गरजेचे आहे. मुळात, बचत फार महत्वाची असते. विद्यार्थ्यांनी आताच बचत करणे सुरु करावे. क्रेडिट कार्डमुळे सहज कर्ज मिळतो. पण थेंबे थेंबे तळे साचे. पुढे जाऊन हा कर्ज मोठ्या रूपाने समोर येतो. म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करताना योग्य फंड निवडणे. योग्य मार्गदर्शनाशिवाय या क्षेत्रात पाऊल टाकणे. या चुका शक्यतो टाळावेत.
तरुणांनी योग्य करिअर आणि आर्थिक निर्णय घेण्यासाठी काही महत्त्वाचे टप्पे पाळणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, आपल्या आवडीनुसार आणि कौशल्यांनुसार करिअर निवडणे फार गरजेचे आहे. दुसऱ्याच्या दबावाखाली किंवा फक्त पैशासाठी निवडलेली नोकरी दीर्घकाळ टिकत नाही. त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेणे, मेंटर्सशी चर्चा करणे आणि इंडस्ट्रीचा अभ्यास करून पुढे जाणे उपयोगी ठरते. आर्थिक शिस्तीचा भाग म्हणून, लवकरात लवकर बचत सुरू करणे, मासिक बजेट तयार करणे, आणि गुंतवणुकीचे योग्य मार्ग समजून घेणे आवश्यक आहे.
SIP, PPF, म्युच्युअल फंड अशा पर्यायांचा अभ्यास करावा आणि व्याजदर, जोखीम आणि टॅक्स लाभ यांचा विचार करूनच गुंतवणूक करावी. यासोबतच, आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी ऑनलाईन कोर्सेस, सेमिनार्स, आणि पुस्तके यांचा आधार घ्यावा. शेवटी, आजच्या स्पर्धात्मक युगात सतत शिकणे आणि नवीन कौशल्ये आत्मसात करणे हे करिअरमध्ये टिकून राहण्यासाठी अत्यंत आवश्यक झाले आहे. अशी योग्य दिशा घेतल्यास तरुण आपले करिअर आणि आर्थिक भविष्य दोन्ही सुरक्षित करू शकतात.