फोटो सौजन्य - Social Media
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) मध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. DMRC ने सिक्योरिटी इन्स्पेक्टर (Security Inspector) पदासाठी भरती जाहीर केली असून, इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना अधिकृत वेबसाइट [www.delhimetrorail.com](https://www.delhimetrorail.com) वर जाऊन अधिसूचना वाचावी व अर्ज संबंधित पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवावा लागेल.
सदर भरतीत सिक्योरिटी इन्स्पेक्टर या पदासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे अधिकृत अधिसूचनेत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. यासोबतच, उमेदवाराची किमान वयोमर्यादा 55 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 62 वर्षे इतकी निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत केंद्र सरकारच्या नियमानुसार सवलत दिली जाणार आहे. निवड प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असेल. अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी पात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल आणि यातील निवड झालेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतनश्रेणीत ₹51,100 ते ₹59,800 इतका मासिक पगार मिळणार आहे. दिल्ली मेट्रो सारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची ही सुवर्णसंधी असून, यामुळे उमेदवारांना सुरक्षित नोकरीसह उत्तम वेतन मिळण्याची संधी मिळणार आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या अनुभवी उमेदवारांनी ही संधी गमावू नये.
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज दिलेल्या नमुन्यात भरून आवश्यक त्या शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभवाचे कागदपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर पाठवावेत – एग्जिक्युटिव डायरेक्टर (मानव संसाधन), दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बाराखंभा रोड, नवी दिल्ली – 110001. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मे 2025 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आपला अर्ज वेळेत सादर करावा आणि एक उज्वल करिअर घडवण्याची संधी साधावी.