
फोटो सौजन्य - Social Media
काय असतं Fire Engineer?
करिअरची निवड करताना केवळ आवडच नव्हे, तर मानसिक आणि शारीरिक तयारीही तितकीच महत्त्वाची असते. विशेषतः जीवित आणि मालमत्तेच्या संरक्षणाशी थेट संबंधित असलेल्या फायर इंजिनिअरिंगसारख्या क्षेत्रात ही बाब अधिक महत्त्वाची ठरते. आग लागण्याची कारणे शोधणे, ती रोखण्यासाठी उपाययोजना करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेणे, हे फायर इंजिनिअरिंगमधील व्यावसायिकांचे मुख्य काम असते.
फायर इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना अग्निशामक उपकरणांची सखोल तांत्रिक माहिती दिली जाते. यामध्ये संप्रिंकलर सिस्टीम, फायर अलार्म, वॉटर कॅनन, फायर एक्स्टिंग्विशर यांचा अचूक आणि सुरक्षित वापर कसा करायचा, याचे प्रशिक्षण दिले जाते. कमी वेळेत आणि मर्यादित साधनसंपत्तीमध्ये जास्तीत जास्त जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण कसे करता येईल, यावर विशेष भर दिला जातो. त्यामुळे हा अभ्यासक्रम केवळ सैद्धांतिक न राहता पूर्णतः व्यावहारिक स्वरूपाचा असतो.
पात्रता काय?
फायर इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्यासाठी उमेदवाराने रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा गणित या विषयांसह किमान ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बी.ई. (फायर) या पदवी अभ्यासक्रमासाठी काही संस्थांमार्फत अखिल भारतीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेतली जाते. या क्षेत्रात शारीरिक तंदुरुस्तीला विशेष महत्त्व आहे. पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची १६५ सेंमी आणि वजन ५० किलो असणे आवश्यक आहे. महिलांसाठी किमान उंची १५७ सेंमी आणि वजन ४६ किलो अपेक्षित आहे. दोघांसाठीही दृष्टी ६/६ असावी, तसेच वयोमर्यादा साधारणतः १९ ते २३ वर्षांदरम्यान असते.
प्रवेश परीक्षा आणि प्रक्रिया
काही संस्था विशिष्ट अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची कौशल्ये तपासण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतात. तर काही महाविद्यालयांमध्ये बारावीच्या गुणांच्या आधारे थेट प्रवेश दिला जातो. काही ठिकाणी अर्ज प्रक्रियेचा भाग म्हणून सर्जनशील पोर्टफोलिओ सादर करण्याची अटही असू शकते. हा पोर्टफोलिओ विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे आणि निरीक्षण क्षमतेचे दर्शन घडवतो.
अभ्यासक्रमांचे विविध पर्याय
बी.ई. (फायर) व्यतिरिक्त फायर अँड सेफ्टी डिप्लोमा, पीजी डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी, बीएस्सी इन फायर इंजिनिअरिंग, फायर फायटिंग, फायर टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल सेफ्टी मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल सेफ्टी सुपरवायझर, रेस्क्यू अँड फायर फायटिंग असे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या कोर्सेसमुळे उद्योग, कारखाने, विमानतळ, बंदरे आणि मोठ्या इमारतींमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
प्रमुख संस्था