Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Teaching Jobs: मर्यादित जागांमुळे नोकरीसाठी संघर्ष करताय? ‘या’ देशांमध्ये वाढतीये भारतीय शिक्षकांची मागणी; असा करा अर्ज!

Teaching Jobs Abroad After B.Ed: भारतातून बी.एड. (B.Ed.) केल्यानंतर परदेशात (अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युएई) शिक्षक म्हणून नोकरी कशी मिळवावी? आवश्यक पात्रता, भाषा परीक्षा आणि पगाराचा संपूर्ण तपशील वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 31, 2026 | 04:54 PM
teacher job

teacher job

Follow Us
Follow Us:

Teaching Jobs Abroad After B.Ed: भारतात दरवर्षी अनेक विद्यार्थी बी.एडचे शिक्षण पूर्ण करतात. यातील अनेकजण सरकारी किंवा खाजगी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतात. मात्र मर्यादित जागा आणि वाढती स्पर्धा यामुळे मोठ्या संख्येने शिक्षक नोकरीसाठी संघर्ष करताना दिसतात. परंतु अनेकांना हे माहित नाही की बी.एड. (B.Ed.) पदवीद्वारे भारतातच नव्हे तर परदेशातही नोकरी मिळवता येते.

‘या’ देशात भारतीय शिक्षकांची वाढतीये मागणी

ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, कतार, सौदी अरेबिया, कझाकिस्तान, ब्रिटन आणि अमेरिका यासारख्या देशात प्रशिक्षित शिक्षकांची मागणी सातत्याने वाढत आहे. विशेषत: ज्या शिक्षकांचे इंग्रजीवर प्रभुत्व आहे, त्यांना या देशात उत्कृष्ट संधी मिळते.

Global Medical Exams: नीटपेक्षाही कठीण? डॉक्टर बनण्यासाठी जगभरात द्याव्या लागणाऱ्या ‘या’ सर्वात कठीण परीक्षा नक्की वाचा!

भारतातून बी.एड. केल्यानंतर परदेशात नोकरी कशी करावी?

भारतातून बी.एड केल्यानंतर जर तुम्हाला परदेशात शिक्षक व्हायचे असेल तर सर्व प्रथम तुम्हाला हे माहिती असणे आवश्यक आहे की बहुतांश देशात भारतीय पदवी थेट स्वीकारत नाहीत. तेथे तुम्हाला त्या देशातील मान्यताप्राप्त परीक्षा पास करणे आवश्यक आहे. तसेच या देशात तुमच्या शैक्षणिक योग्यतेचे आणि प्रशिक्षणाचे मूल्यमापन केले जाते. याव्यतिरिक्त, तुम्हाला येथील ‘IELTS’, ‘PTE Academic’ किंवा ‘TOEFL’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय भाषेच्या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात.

वेतन (सॅलरी) किती मिळते?

परदेशात शिक्षकांचे वेतन हे संबंधित देश, त्यांचा अनुभव, विषय आणि शाळेच्या प्रकारानुसार वेगवेगळे असते. सामान्यता परदेशात २ ते ५ लाख रुपयांपर्यंत मासिक पगार मिळू शकतो. यासोबतच अनेक परदेशी शाळा केवळ पगारच देत नाहीत तर निवास व्यवस्था, आरोग्य विमा, येण्या-जाण्याचे हवाई तिकीट, व्हिसासाठी मदत आणि मुलांचे शिक्षण यांसारख्या अतिरक्त सुविधाही मोफत उपलब्ध करून देतात.

National Teachers Award:शिक्षण मंत्रालयाकडून ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ ची घोषणा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता निकष

अर्ज कसा करावा?

परदेशात शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार ‘LinkedIn’, शाळांची अधिकृत संकेतस्थळे (Websites), आंतरराष्ट्रीय भरती संस्था (Recruitment Agencies), सरकारी जॉब पोर्टल आणि शिक्षक भरती मेळाव्यांची (Job Fairs) मदत घेऊ शकतात. तसेच अनेक परदेशी शाळा या भारतातही वेळोवेळी भरती मोहीम राबवतात, जिथे थेट मुलाखतीद्वारे नोकरी मिळवता येते.

Web Title: How to get teaching job abroad after bed degree eligibility salary recruitment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • Abroad Trip
  • Teacher
  • Teacher Jobs
  • Teacher Recruitment

संबंधित बातम्या

Indian Students Returning From Abroad: परदेशातील शिक्षणाची क्रेझ ओसरली? ‘या’ कारणामुळे दोन वर्षांत तब्बल ३१% विद्यार्थी घटले!
1

Indian Students Returning From Abroad: परदेशातील शिक्षणाची क्रेझ ओसरली? ‘या’ कारणामुळे दोन वर्षांत तब्बल ३१% विद्यार्थी घटले!

पवित्र पोर्टलअभावी पालिका शाळांना शिक्षक मिळेना! १२०० शिक्षकांची भरती प्रक्रिया रखडल्याने लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
2

पवित्र पोर्टलअभावी पालिका शाळांना शिक्षक मिळेना! १२०० शिक्षकांची भरती प्रक्रिया रखडल्याने लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.