Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Job Interview Tips: इंग्रजीमुळे जॉब इंटरव्यूची भीती वाटतेय? घरबसल्या ‘या’ ५ सोप्या टिप्स फॉलो करा; मिळवा पहिल्याच प्रयत्नात यश

Improve English for Job Interview: उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतरही इंग्रजीच्या भीतीमुळे मुलाखतीत अपयश येत असेल, तर टेन्शन घेऊ नका. घरबसल्या इंग्रजी सुधारण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी ५ सोप्या व प्रभावी टिप्स जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 07, 2026 | 12:37 PM
job interview

job interview

Follow Us
Follow Us:

How to Improve English for Job Interviews: चांगल्या ग्रेडने प्रोफेशन कोर्सेस पूर्ण केलेले उमेदवार मुलाखतीमध्ये अपयशी ठरतात कारण मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने इंग्रजीत प्रश्न विचारताच त्यांची बोबडी वळते. आशा उमेदवारांसाठी अगदी कमी वेळात इंटरव्यूची इंग्रजीमध्ये कशा प्रकारे तयारी करता येते हे आता आपण जाणून घेणार आहोत.

भाषा जेवढी सोपी, तेवढी उत्तम

अनेकदा लोकांना वाटते की, जॉब इंटरव्यूमध्ये खूप कठीण इंग्रजी बोलल्यास किंवा क्लिष्ट शब्दांचा वापर केल्यासच नोकरी मिळेल, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. खरी गोष्ट अशी आहे की, मुलाखत घेणाऱ्याला तुमची भाषा समजली पाहिजे. तुम्ही जितके सरळ आणि सोपे शब्द वापराल, तितके तुमचे बोलणे प्रभावी ठरेल. कठीण शब्द पाठ करण्यापेक्षा छोटी आणि स्पष्ट वाक्ये (Short Sentences) तयार करण्याची सवय लावा. यामुळे चुका होण्याची शक्यता कमी होते.

आरशासमोर सराव (Mirror Practice)

अनेत शतकापासून चालत आलेला उपाय आजही सर्वात प्रभावी आहे. दररोज किमान १५ मिनिटे आरशासमोर उभे राहून स्वतःची ओळख (Introduction) देण्याचा सराव करा. जेव्हा तुम्ही स्वतःला बोलताना पाहता, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव (Expressions) आणि देहबोलीतील उणिवा स्पष्ट दिसतात. यामुळे मनातील संकोच दूर होईल आणि इंटरव्यू रूममध्ये जाण्याची भीती संपेल.

MBA Career Options: पदवीनंतर एमबीए करायचंय? ‘या’ ८ स्ट्रीममध्ये स्पेशलायझेशन करून मिळवा कोट्यवधींचे पॅकेज

इंग्रजीत विचार करण्याची सवय लावा

अनेक लोक आधी डोक्यात मराठी किंवा हिंदीत विचार करतात, मग त्याचे इंग्रजीत भाषांतर करतात आणि नंतर बोलतात. या गडबडीत गाडी मध्येच रेंगाळते. ही सवय बदलण्यासाठी तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींवर इंग्रजीत विचार करण्यास सुरुवात करा. उदाहरणार्थ- जर तुम्हाला भूक लागली असेल, तर मनात ‘मला भूक लागली आहे’ असा विचार करण्याऐवजी ‘I am hungry’ असा विचार करण्याचा प्रयत्न करा. ही छोटीशी सवय तुमची फ्लुएन्सी (Fluency – बोलण्याचा ओघ) वेगाने वाढवेल.

मुलाखतीतील ठरलेल्या प्रश्नांची उत्तरे आधीच ठेवा तयार

प्रत्येक जॉब इंटरव्यूमध्ये काही प्रश्न अगदी ठरलेले असतात. जसे की- Tell me about yourself (तुमच्याबद्दल सांगा), Why should we hire you? (आम्ही तुम्हाला नोकरीवर का ठेवावे?) किंवा What are your strengths? (तुमच्या जमेच्या बाजू कोणत्या?). अशा ५-६ महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आधीच इंग्रजीत लिहून तयार ठेवा आणि त्यांचा वारंवार बोलून सराव करा. जेव्हा या मूलभूत प्रश्नांची उत्तरे तुमच्या तोंडावर बसतील, तेव्हा मुलाखतीच्या सुरुवातीलाच तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडेल.

PMC School Holiday: पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! ‘या’ शाळांना रविवारपर्यंत सुट्टी;वारकऱ्यांच्या निवासासाठी प्रशासनाची जय्यत तयारी

फोनच्या व्हॉईस रेकॉर्डरचा करा योग्य वापर

मुलाखतीच्या तयारीचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे स्वतःचे बोलणे रेकॉर्ड करणे. तुमच्या मोबाईलचा व्हॉईस रेकॉर्डर सुरू करा आणि कोणत्याही विषयावर २ मिनिटे इंग्रजीत बोला. नंतर ते रेकॉर्डिंग स्वतः ऐका. तुम्ही कुठे अडकत आहात, कुठे व्याकरणाची चूक होत आहे किंवा कुठे तुमचा आवाज कमी पडत आहे, हे तुमचे तुम्हालाच समजेल. या आत्मपरीक्षणामुळे (Self-assessment) तुमच्या इंग्रजीत जादूई सुधारणा होईल.

Web Title: How to improve spoken english for job interview tips mirror practice voice recorder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • Interview for Jobs

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.