फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Highest salary after MBA Career Options: पदवीनंतर कॉर्पोरेट जगतात मोठी झेप घेण्यासाठी एमबीए (MBA) हा एक परफेक्ट पर्याय मानला जातो. दरवर्षी लाखो तरुण उत्तम पॅकेजच्या आशेने बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश घेतात. परंतु, एमबीएच्या या प्रवासातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट येतो ‘स्पेशलायझेशन’ म्हणजेच स्ट्रीम निवडताना. मार्केटिंग, फायनान्स किंवा डेटा आणि एआय (AI).. पर्याय इतके आहेत की चांगल्या चांगल्यांचा गोंधळ उडेल. चुकीची स्ट्रीम निवडल्यास आयुष्याची २ वर्षे वाया जाऊ शकतात.
आजचे आधुनिक जॉब मार्केट फक्त पदवी नाही, तर योग्य आणि मागणीत असणारी कौशल्ये (Skills) पाहते. चला तर मग जाणून घेऊया अशा ८ एमबीए कोर्सेसबद्दल ज्यामध्ये तुम्ही एमबीए करू शकता.
एमबीएचा फुल फॉर्म ‘मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन’ (Master of Business Administration) असा आहे. एमबीए हा कोर्स २ वर्षांचा असतो. तसेच याच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशन निवडण्याची संधी मिळते. याच टप्प्यावरून तुमच्या करिअरचा पाया रचला जातो. म्हणूनच, एमबीए स्पेशलायझेशन निवडताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जाणून घ्या एमबीएच्या सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या प्रमुख स्ट्रीम्स कोणत्या आहेत:
या क्षेत्रात बिझनेस वाढवण्यासाठी डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्सचा वापर कसा करावा, हे शिकवले जाते. सध्याच्या घडीला ही सर्वाधिक सॅलरी देणारी आणि ‘फ्युचर-प्रूफ’ (भविष्याची हमी देणारी) स्ट्रीम बनली आहे.
हे कॉर्पोरेट जगतातील सर्वात श्रीमंत क्षेत्र मानले जाते. इन्व्हेस्टमेंट बँकिंग, फिनटेक (FinTech) आणि कॉर्पोरेट वेल्थ मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रांमध्ये या स्ट्रीमच्या प्रोफेशनल्सना सुरुवातीपासूनच मोठी पॅकेजेस ऑफर केली जातात.
जुनाट पद्धतीचे सेल्स आणि होर्डिंग्सचे दिवस आता संपले आहेत. आता संपूर्ण खेळ परफॉर्मन्स मार्केटिंग, सोशल मीडिया स्ट्रॅटेजी आणि ई-कॉमर्सचा आहे. जे लोक क्रिएटिव्ह आहेत आणि ज्यांना ग्राहकांची नाडी अचूक ओळखता येते, त्यांच्यासाठी हे अत्यंत उत्तम क्षेत्र आहे.
हे क्षेत्र तंत्रज्ञानाचे जग (Technical World) आणि बिझनेस स्ट्रॅटेजी यामधील महत्त्वाचा दुवा आहे. टेक कंपन्या, सॉफ्टवेअर फर्म्स आणि स्टार्टअप्समध्ये ‘प्रॉडक्ट मॅनेजर’ किंवा ‘सीटीओ’ (CTO) यांसारख्या मोठ्या पदांवर पोहोचण्यासाठी हे स्पेशलायझेशन सर्वोत्तम मानले जाते.
जर तुम्हाला मोठ्या कंपन्यांमधील गुंतागुंत आणि बिझनेसशी संबंधित समस्या सोडवायला आवडत असतील, तर मॅनेजमेंट कन्सलटिंगचे क्षेत्र तुमच्यासाठीच आहे. जागतिक स्तरावरील कन्सलटिंग फर्म्स या कामासाठी जगातील सर्वात महागड्या पॅकेजेसपैकी एक देतात.
NCERT Class 8 Book Updates: NCERT चा मोठा निर्णय! इयत्ता ८ वीच्या पाठ्यपुस्तकात केले ‘हे’ मोठे बदल
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स क्रांतीनंतर या क्षेत्राचे मूल्य गगनाला भिडले आहे. कारखान्यांपासून ते थेट तुमच्या घरापर्यंत सामान योग्य वेळेत आणि कमी खर्चात कसे पोहोचवायचे, याचे संपूर्ण व्यवस्थापन याद्वारे केले जाते.
ग्लोबल ब्रँड्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रस असणाऱ्यांसाठी हे एक दमदार करिअर आहे. क्रॉस-बॉर्डर ट्रेड, इम्पोर्ट-एक्सपोर्ट आणि ग्लोबल सप्लाय चेन सांभाळणाऱ्या मॅनेजर्सची मागणी नेहमीच कायम असते.
फायनान्स आणि टेक्नॉलॉजीचे हे नवीन कॉम्बिनेशन सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. डिजिटल पेमेंट, क्रिप्टोकरन्सी आणि बँकिंग ॲप्सच्या या युगात या स्पेशलायझेशन असणाऱ्या तरुणांची मागणी खूप वेगाने वाढली आहे.






