फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Pune PMC School Holiday: सध्या पावसाच्या वाढत्या जोरामुळे आळंदी आणि देहू या ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या राहण्याची सोय पुण्यातील महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात येणार आहे. तसेच आता पुणे महापालिकेच्या १०१ शाळांना पुढचा आठवडाभर सुट्टी देण्यात आली असून शहरातील महापालिकेच्या इतर शाळा आणि सर्व खाजगी शाळा या कालावधीत सुरू राहणार आहेत. पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आदेश दिला आहे की पुणे महापालिकेच्या हद्दीतील तब्बल १०१ शाळांना थेट रविवारपर्यंत पूर्ण सुट्टी राहील.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यासोबत पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी महाराष्ट्रातील लाखोच्या संख्येने वारकरी या वारीत सामील झाले आहेत. परंतु गेल्या चार पाच दिवसात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देहू आणि आळंदी परिसरात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे या भाविकांना आश्रय देण्याच्या उद्देशाने हा निर्णय महानगरपालिकेद्वारे घेण्यात आला आहे. वारीसाठी पुणे शहरात दाखल होणाऱ्या आणि पूरग्रस्त भागातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेल्या लाखो वारकऱ्यांना राहण्यासाठी पुणे महापालिकेच्या 100 पेक्षा जास्त शाळांचे रुपांतर तात्पुरत्या निवासस्थानात करण्यात येणार आहे.
NCERT Class 8 Book Updates: NCERT चा मोठा निर्णय! इयत्ता ८ वीच्या पाठ्यपुस्तकात केले ‘हे’ मोठे बदल
या शाळांमध्ये वारकऱ्यांची राहण्याची, खाण्याची आणि आरोग्याची संपूर्ण व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे. याच सामाजिक आणि धार्मिक भान राखत प्रशासनाने या 101 शाळांमधील विद्यार्थ्यांना रविवारपर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून वारकऱ्यांच्या निवासात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.
आळंदी देवस्थानाचे प्रमुख आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले आहे की, इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे या परिसरातील सर्व पूल पाण्याखाली गेले आहेत, तर सर्व वारकऱ्यांना विनंती केली आहे की त्यांनी आळंदी देवस्थानाकडे न जाता पुण्यालाच थांबावे. आता पुणे महानगरपालिकेकडून येणाऱ्या वारकऱ्यांची सगळी व्यवस्था केली जाईल. त्यामुळे साधारण पुणे महानगरपालिकेच्या १०१ शाळांमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे.
या सर्व परिस्थितीत पुणे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. रविवारनंतर पुन्हा पाण्याची व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. सगळीकडे स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली असून ट्रॅफिकची व्यवस्थासुद्धा लवकरच सुरळीत केली जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे.






