Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

How to Use AI: NEET, JEE आणि UPSC तयारी आता होणार आणखी सोपी; AI ठरणार विद्यार्थ्यांचा स्मार्ट स्टडी पार्टनर!

How to Use AI: एआयने शाळा-कॉलेजेसपासून ते प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांपर्यंतची तयारी सोपी केली आहे. आता मुले एआयच्या सहाय्याने नीट, जेईई आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहेत. यामुळे महागड्या कोचिंगचा खर्च वाचत आहे आणि वेळेचीही बचत होत आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 29, 2026 | 04:08 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:

How to Use AI: देशातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये नीट जेईई आणि यूपीएससीची गणना केली जाते. या परीक्षा पास करण्यासाठी लाखो तरुण दिवस रात्र एक करतात. पूर्वी या परीक्षांचा अर्थ हा वेगळा होता मात्र आता एआयच्या युगात हे सर्व वेगाने बदलत आहे. एआय शिक्षण घेण्याच्या, समजून घेण्याच्या आणि कुमकुवतपणा ओळखून त्यात सुधारणा करण्याच्या पद्धतीला नव्याने आकार देत आहे.

एआय अँड बियॉन्डचे को फाउंडर जसप्रित ब्रिंद्रा यांचे मत आहे की एआय ही विद्यार्थ्यांची तयारी अचूक आणि प्रभावी बनवणारी एक स्मार्ट जोडीदार आहे. त्यामुळे कष्टाची जागा कोणी घेऊ शकत नाही, तर सातत्यपूर्ण अभ्यास संकल्पना स्पष्ट असणे आणि दबावातील योग्य घेण्याच्या क्षमतेमुळे मिळते.

एआयच्या मदतीने नीट, जेईई आणि यूपीएससीची तयारी कशी करावी?

एआयने शाळा-कॉलेजेसपासून ते प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांपर्यंतची तयारी सोपी केली आहे. आता मुले एआयच्या सहाय्याने नीट, जेईई आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहेत. यामुळे महागड्या कोचिंगचा खर्च वाचत आहे आणि वेळेचीही बचत होत आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ‘पर्सनललाइज्ड लर्निंग’

कोचिंग सेंटरमध्ये एकाच क्लासरुममध्ये २०० विद्यार्थी बसतात. शिक्षक सर्वांना एकाच स्पीडने शिकवतात. पण प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची क्षमता आणि वेग वेगवेगळा असतो. एआय-बेस्ड लर्निंग सिस्टम प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता, गुण आणि कमकुवतपणाचे खोलवर विश्लेषण करतात. जर एखादा विद्यार्थी जेईईमध्ये ऑरगॅनिक केमिस्ट्री किंवा फिजिक्सच्या एखाद्या न्यूमेरिकलमध्ये अडकत असेल, तर एआय त्याला त्याच विषयानुसार कस्टमाइज्ड स्पष्टीकरण आणि सरावासाठी प्रश्न उपलब्ध करून देते.

इन्स्टंट फीडबैक आणि अडॅप्टिव्ह मॉक टेस्ट

अनेकदा विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजचा निकाल आल्यावर किंवा शिक्षकांकडून रिव्ह्यू मिळाल्यानंतरच आपल्या चुकांची जाणीव होते. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) तयार केलेल्या मॉक टेस्ट विद्यार्थ्यांच्या प्रत्येक उत्तरासोबत जुळवून घेतात. जर विद्यार्थ्याने एखादा प्रश्न चुकीचा सोडवला, तर एआय लगेच त्याचे कारण स्पष्ट करते. यामुळे टाइम मॅनेजमेंटमध्ये सुधारणा होत आहे. हा रिअल-टाइम फीडबॅक विद्यार्थ्यांसाठी गेमचेंजर ठरत आहे.

छोट्या शहरांमधील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी

भारतात वर्षानुवर्षे दर्जेदार कोचिंगचे वर्चस्व कोटा, दिल्ली किंवा हैदराबादसारख्या निवडक शहरांपुरतेच मर्यादित होते. गावखेड्यातील किंवा छोट्या शहरांमधील मुले अवाजवी फी आणि राहण्याच्या खर्चामुळे मागे पडत असत. एआय टूल्स बहुभाषिक आणि संभाषणात्मक शैलीत उपलब्ध आहेत. यामुळे तयारीसाठी इतर शहरांमध्ये राहण्याचा ताण संपला आहे. आता गावातील मुलगाही अत्यंत कमी खर्चात एआयच्या मदतीने नीट, जेईई आणि यूपीएससीची तयारी करू शकतो.

MIT-WPU 8th Convocation: १७ पीएचडी संशोधकांसह ७,८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव!

NEET, JEE आणि UPSC: वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळी रणनीती

एआय वापरण्याची पद्धत प्रत्येक परीक्षेच्या स्वरूपाळानुसार बदलते:

नीट आणि जेईई: येथे एआय पर्सनलाइज्ड प्रश्न बँक, संकल्पना सिमुलेशन आणि स्पीड-अक्युरसी ॲनालिटिक्समध्ये सर्वाधिक मदत करते.

यूपीएससी: नागरी सेवांच्या तयारीत अभ्यासक्रम, भरपूर डेटा वर्गीकरण, चालू घडामोडींचा सारांश तयार करणे आणि निबंध लेखनासाठी तार्किक युक्तिवाद तयार करण्यात एआय अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

मानवी बुद्धिमत्तेला कोणतीही पर्याय नाही

यूपीएससी नागरी सेवासारख्या परीक्षांमध्ये केवळ फॅक्ट्स लक्षात ठेवणे पुरेसे नसते. यामध्ये यशस्वी होण्यासाठी विविध दृष्टिकोनांचे महत्त्वपूर्ण मूल्यमापन करणे आवश्यक असते. तसेच स्वतःहून योग्य निर्णय घेण्याची क्षमताही असायला हवी. हे कौशल्य केवळ मानवी मेंदूजवळ असते. एआय हे अभ्यासाचे केवळ एक साधन आहे, मालक नाही. विचार न करता एआयच्या उत्तरांवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे कि एआय कधीकधी चुकीचे किंवा दिशाभूल करणारे तथ्य देखील देऊ शकते.

RRB Station Master Recruitment 2026: रेल्वे विभागात स्टेशन मास्टर पदावर बंपर भरती; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

एआयसह यशाचे नवीन सूत्र

भविष्यातील परीक्षांमध्ये केवळ तपशील लक्षात ठेवणे यशाची हमी असणार नाही, कारण माहिती तर एका क्लिकवर उपलब्ध असते. खरा फरक यावरून ठररेल की कोणता उमेदवार चांगले प्रश्न विचारू शकतो, आपल्या क्रिटिकल थिंकिंगचा वापर करतो आणि परीक्षा हॉलमधील ताणतणाव कसा हाताळतो. एआय तुमचे कष्ट कमी करत नाही, तर वेळेचा योग्य वापर सुनिश्चित करते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये एआय (AI) कशा प्रकारे मदत करते?

    Ans: एआय विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार 'पर्सनललाइज्ड लर्निंग', इन्स्टंट फीडबॅक, अडॅप्टिव्ह मॉक टेस्ट आणि अभ्यासक्रमाचे अचूक विश्लेषण करून वेळ वाचवण्यास मदत करते.

  • Que: छोट्या शहरांमधील विद्यार्थ्यांना एआयचा काय फायदा होत आहे?

    Ans: बहुभाषिक आणि संभाषणात्मक एआय टूल्समुळे विद्यार्थ्यांना कोटा किंवा दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन महागडे कोचिंग घेण्याची गरज उरलेली नाही.

  • Que: यूपीएससी आणि नीट-जेईईच्या तयारीसाठी एआयचा वापर कसा बदलतो?

    Ans: नीट-जेईईसाठी एआय प्रश्न बँक व सिमुलेशनमध्ये मदत करते, तर यूपीएससीसाठी चालू घडामोडींचा सारांश आणि निबंध लेखनाचे युक्तिवाद तयार करण्यात उपयुक्त ठरते.

Web Title: How to use ai for neet jee upsc preparation marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • ai
  • education
  • study

संबंधित बातम्या

MIT-WPU 8th Convocation: १७ पीएचडी संशोधकांसह ७,८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव!
1

MIT-WPU 8th Convocation: १७ पीएचडी संशोधकांसह ७,८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव!

Amazon layoffs 2026: सकाळी ईमेल पाहिला, अन् नोकरी गेली…; Amazon मध्ये पुन्हा मोठी नोकरकपात, 250 कर्मचाऱ्यांना फटका
2

Amazon layoffs 2026: सकाळी ईमेल पाहिला, अन् नोकरी गेली…; Amazon मध्ये पुन्हा मोठी नोकरकपात, 250 कर्मचाऱ्यांना फटका

Nalanda Medical College: नालंदा मेडिकल कॉलेजच्या १४६ विद्यार्थ्यांना ३ महिन्यांसाठी केले सस्पेंड; पण नेमकं प्रकरण काय?
3

Nalanda Medical College: नालंदा मेडिकल कॉलेजच्या १४६ विद्यार्थ्यांना ३ महिन्यांसाठी केले सस्पेंड; पण नेमकं प्रकरण काय?

Ashok Saraf: कुर्ता-धोतर नेसून लॅम्बोर्गिनीमध्ये बसले अशोक सराफ; स्वप्नील जोशीची कमेंट चर्चेत
4

Ashok Saraf: कुर्ता-धोतर नेसून लॅम्बोर्गिनीमध्ये बसले अशोक सराफ; स्वप्नील जोशीची कमेंट चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.