Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MIT-WPU 8th Convocation: १७ पीएचडी संशोधकांसह ७,८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव!

MIT-WPU 8th Convocation: एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या ८ व्या पदवीदान समारंभात १७ पीएचडीसह ७,८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. राज्यपाल आर्लेकर, न्यायमूर्ती उदय ललित व अन्य मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 29, 2026 | 02:44 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या पदवीदान समारंभात राज्यपाल आर्लेकर यांचे तरुणांना मार्गदर्शन
  • १७ पीएचडी संशोधकांसह ७,८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; ३४५ विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्तेबद्दल सन्मान
  • गुणवंत विद्यार्थ्यांना १३५ सुवर्ण, १०५ रौप्य आणि १०५ कांस्यपदके बहाल
MIT-WPU 8th Convocation: “शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी मिळवणे, नोकरी मिळवणे किंवा यशस्वी करिअर घडवणे एवढाच नाही. शिक्षणाने पाठ्यपुस्तके आणि वर्गांच्या पलीकडे जाऊन शिस्त, समर्पण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चारित्र्य घडवले पाहिजे. जेव्हा आपण चारित्र्यनिर्मिती करतो, तेव्हा जबाबदार नागरिक घडतात आणि त्यातूनच राष्ट्रनिर्मिती आपोआप घडून येते,” असे प्रतिपादन तमिळनाडूचे राज्यपाल श्री राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी केले. पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU) च्या ८ व्या पदवीदान समारंभात पदवीधरांना संबोधित करताना ते बोलत होते.

श्री आर्लेकर या पदवीदान समारंभाचे मुख्य अतिथी होते. या प्रसंगी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी गोवाचे मानद कुलपती आणि अमेरिकेच्या बफेलो युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश के. त्रिपाठी; माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल व्ही. कराड; आणि एमआयटी-डब्ल्यूपीयूचे कुलगुरू प्रा. (डॉ.) रविराजा एन. सीताराम यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.

भारताचे भविष्य घडवण्यात तरुण पिढीच्या भूमिकेवर भर देताना श्री आर्लेकर पुढे म्हणाले, “आजची ‘जेन झी’ ही आपल्या देशाच्या खऱ्या युवाशक्तीचे प्रतिनिधित्व करते. भारताचे भविष्य तुमच्या हातात आहे आणि तुमचे ज्ञान, कौशल्ये, अनुभव व कौशल्य हे समाज व राष्ट्राच्या कामी आले पाहिजे. भारत जेव्हा ‘विकसित भारत २०४७’ च्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे, तेव्हा प्रत्येक तरुणाने या परिवर्तनात आपण काय योगदान देऊ शकतो, असा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. जर आपण आपले जीवन केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर समाज आणि देशाच्या मोठ्या हितासाठी समर्पित केले, तरच शिक्षणाचा खरा उद्देश साध्य होतो.”

एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या ८ व्या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक यश साजरे करण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा चिन्हांकित करण्यासाठी विद्यापीठाचे नेतृत्व, प्राध्यापक, पदवीधर विद्यार्थी, पालक आणि नामवंत अतिथी एकत्र आले होते. या समारंभाने विद्यापीठाची शिक्षण, नवसंशोधन, नेतृत्व आणि जागतिक शांततेच्या ध्येयाप्रती असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

१७ पीएचडी संशोधकांसह ७,८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

या समारंभाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे १७ पीएचडी संशोधकांसह ७,८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी विविध शाखांमधील त्यांच्या शैक्षणिक यशाची आणि योगदानाची दखल घेण्यात आली. डॉक्टरेट पदवीधरांचा त्यांच्या संशोधनातील योगदान आणि शैक्षणिक कामगिरीबद्दल विशेष गौरव करण्यात आला. तसेच, उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी आणि गुणवत्तेबद्दल ३४५ पदक विजेत्यांचा सन्मान करण्यात आला, ज्यामध्ये १३५ सुवर्ण, १०५ रौप्य आणि १०५ कांस्यपदक विजेत्यांचा समावेश होता. स्कूल ऑफ सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटल स्टडीजच्या सुश्री धनश्री राजेंद्र म्हसे यांना त्यांच्या विशेष शैक्षणिक यशाबद्दल ‘फाउंडर प्रेसिडेंट मेडल’ने सन्मानित करण्यात आले.

दीक्षान्त समारंभाच्या दुसऱ्या दिवसाचे प्रमुख पाहुणे, न्यायमूर्ती उदय ललित, भारताचे माजी सरन्यायाधीश म्हणाले की, “शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणे नव्हे, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी ही आहे. MIT-WPU चे पदवीधर म्हणून, ज्ञानाच्या परिवर्तनकारी शक्तीवर उभारलेल्या संस्थेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही कोणताही व्यवसाय किंवा क्षेत्र निवडले, तरी प्रामाणिकपणा, सचोटी आणि उत्कृष्टतेची मूल्ये जपा आणि तुमच्या कौशल्यांचा उपयोग सकारात्मक बदल घडवण्यासाठी करा.

देश आणि समाज तुमच्याकडे आशेने पाहत आहेत. आत्मविश्वासाने जगात पुढे जा, प्रत्येक आव्हानाला सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे जा आणि आपल्या विद्यापीठाचा नावलौकिक वाढवा.”

NEET PG 2026 Update: मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा ट्रेंड बदलला? नीट पीजीच्या पहिल्या फेरीत ‘या’ अभ्यासक्रमाने मारली बाजी

डॉ. अशोक खेमका, IAS (निवृत्त), हरियाणा सरकारचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव, समारंभाला लाभलेले सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते, ते म्हणाले, “पदवी मिळणे म्हणजे शेवट नव्हे, तर जबाबदारीची सुरुवात आहे. तंत्रज्ञान, स्पर्धा आणि बदलांनी घडलेल्या जगात पाऊल ठेवताना, नवनवीन प्रयोग करण्याचे धैर्य, बदल घडवण्याची सर्जनशीलता आणि कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेली सचोटी जोपासा.

व्यावसायिक कौशल्ये तुम्हाला प्रगती करण्यास मदत करतील; मात्र सचोटीमुळे तुम्ही ताठ मानेने जगू शकाल. प्रचलित समजुतींवर प्रश्न विचारा, टीकेतून शिका आणि प्रामाणिकपणा व सद्सदविवेक बुद्धीच्या आधारावर योग्य ठरवता येतील असे निर्णय घ्या. तुमच्या यशामुळे तुमच्या कुटुंबाचा अभिमान वाढू द्या आणि समाजासाठी अर्थपूर्ण योगदान द्या.”

पदवीदान समारंभाचे सन्माननीय अतिथी, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी गोवाचे मानद कुलपती आणि बफेलो युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश के. त्रिपाठी म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आपल्या आयुष्यातील जवळपास प्रत्येक पैलूला नवीन आकार देत आहे आणि तिचा जबाबदारीने कसा वापर करायचा हे तुमच्या पिढीला ठरवायचे आहे. तुम्ही एका वेगाने बदलणाऱ्या जगात पाऊल टाकत असताना, महत्त्वाकांक्षी पण परिस्थितीशी जुळवून घेणारे राहा, इतरांकडून शिका आणि अर्थपूर्ण धोके पत्करण्यास तयार राहा. तुमचे ज्ञान, सर्जनशीलता आणि कौशल्याचा वापर बुद्धिमत्ता, नैतिक उद्देश आणि जनकल्याणासाठी करा.”

Nalanda Medical College: नालंदा मेडिकल कॉलेजच्या १४६ विद्यार्थ्यांना ३ महिन्यांसाठी केले सस्पेंड; पण नेमकं प्रकरण काय?

विज्ञान, अध्यात्म आणि मानवी मूल्यांची संगा़ड घालणे आवश्यक

माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल व्ही. कराड म्हणाले, “आज पदवी प्राप्त करत असताना तुमची जबाबदारी केवळ नोकरी मिळवणे, व्यवसाय सुरू करणे किंवा वैयक्तिक यश मिळवण्यापुरती मर्यादित नाही. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे राजदूत म्हणून, तुम्ही समाजात कसे योगदान देऊ शकता आणि देशाचे भविष्य घडवण्यात कशी मदत करू शकता याचा विचार केला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगाने होणाऱ्या तांत्रिक बदलांच्या या युगात, अधिक शांततापूर्ण आणि जबाबदार जग निर्माण करण्यासाठी विज्ञान, अध्यात्म आणि मानवी मूल्यांची सांगड घालणे आवश्यक आहे.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: एमआयटी-डब्ल्यूपीयूचा कितवा पदवीदान समारंभ नुकताच पार पडला?

    Ans: एमआयटी-डब्ल्यूपीयूचा ८ वा पदवीदान समारंभ पार पडला.

  • Que: या समारंभात एकूण किती विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या?

    Ans: या समारंभात १७ पीएचडी संशोधकांसह एकूण ७,८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

  • Que: 'फाउंडर प्रेसिडेंट मेडल' कोणाला सन्मानित करण्यात आले?

    Ans: स्कूल ऑफ सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटल स्टडीजच्या सुश्री धनश्री राजेंद्र म्हसे यांना 'फाउंडर प्रेसिडेंट मेडल'ने सन्मानित करण्यात आले.

Web Title: Mit wpu 8th convocation ceremony 2026 pune marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • education
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Google Pay, PhonePe वापरणाऱ्या SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! UPI सेवा ‘या’ दिवशी राहणार बंद?
1

Google Pay, PhonePe वापरणाऱ्या SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! UPI सेवा ‘या’ दिवशी राहणार बंद?

Nalanda Medical College: नालंदा मेडिकल कॉलेजच्या १४६ विद्यार्थ्यांना ३ महिन्यांसाठी केले सस्पेंड; पण नेमकं प्रकरण काय?
2

Nalanda Medical College: नालंदा मेडिकल कॉलेजच्या १४६ विद्यार्थ्यांना ३ महिन्यांसाठी केले सस्पेंड; पण नेमकं प्रकरण काय?

Reliance Industries Results: तिमाही निकाल ‘या’ दिवशी जाहीर होणार; लाभांश मिळणार का?
3

Reliance Industries Results: तिमाही निकाल ‘या’ दिवशी जाहीर होणार; लाभांश मिळणार का?

Benjamin Netanyahu education: बेंजामिन नेतन्याहू यांचे शिक्षण कुठे झाले? राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे? जाणून घ्या
4

Benjamin Netanyahu education: बेंजामिन नेतन्याहू यांचे शिक्षण कुठे झाले? राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.