
फोटो सौजन्य - Social Media
काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) यांनी अखेर इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE – इयत्ता 10वी) आणि इंडियन स्कूल सर्टिफिकेट (ISC – इयत्ता 12वी) बोर्ड परीक्षा 2026 साठीची अधिकृत डेटशीट जाहीर केली आहे. ही घोषणा गुरुवार, 13 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आली. मग जर तुम्ही CISCE बोर्डातून शिक्षण घेत आहात तर तयारीला लागण्याची वेळ आली आहे. वेळापत्रक जाहीर झाले आहे. (When ICSE Exam will start)
या वेळापत्रकानुसार, ICSE 10वीची परीक्षा 17 फेब्रुवारी रोजी सुरु होणार असून. ही परीक्षा 30 मार्च 2026 पर्यंत, या कालावधीत पार पडणार आहे, तर ISC 12वीची परीक्षा 12 फेब्रुवारी ते 6 एप्रिल 2026 दरम्यान घेतली जाणार आहे. यंदा मागील काही वर्षांच्या तुलनेत या परीक्षा थोड्या लवकर सुरू होत आहेत. (When ISC Exam will start)
अंदाजे 2.6 लाख विद्यार्थी ICSE 10वी आणि 1.5 लाख विद्यार्थी ISC 12वी परीक्षेस बसणार आहेत. परीक्षा काळात दोन्ही वर्गांसाठी स्वतंत्र वेळापत्रक (Time Table) जाहीर करण्यात आले असून, सर्व शाळांना ते पोहचवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सल्ला देण्यात आला आहे की त्यांनी अधिकृत वेबसाइटवरून वेळापत्रक डाउनलोड करून आपल्या तयारीसाठी योग्य नियोजन करावे. ( Timetable for ICSE)
वेबसाइटवर डेटशीट कशी पाहाल?
महत्त्वाचे:
विद्यार्थ्यांनी या वेळापत्रकानुसार तयारी सुरू करावी आणि प्रॅक्टिकल परीक्षा व इतर अंतर्गत मूल्यमापनासाठी शाळेकडून मिळणाऱ्या तारखा तपासाव्यात. यंदा बोर्डाने परीक्षा वेळेत पूर्ण होण्यासाठी खास योजना आखली असून, निकाल मे 2026 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.