
IIIT PUNE
इलेक्ट्रॉनिक सिस्टिम डिझाइन अँड मॅन्युफॅक्चरिंग (ईएसडीएम) तसेच आयटी/आयटीईएस क्षेत्रात डॉक्टरेट संशोधन क्षमता विकसित करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. योजनेअंतर्गत पात्र संशोधकांना दरमहा शिष्यवृत्ती, वार्षिक संशोधन आकस्मिक निधी, भाड्याच्या निवासासाठी परतावा तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवास सहाय्य दिले जाते. याशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित संशोधन संस्थांसोबत सहकार्याला प्रोत्साहन दिले जाते.
School Dropouts: एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही; राज्यभर विशेष शोधमोहीम राबवण्याचे निर्देश
आयआयआयटी पुणेला मिळालेल्या या निधीमुळे संस्थेची संशोधन क्षमता अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. तसेच सक्षम संशोधक आणि संशोधन प्रतिभा आकर्षित करून राष्ट्रीय तंत्रज्ञान प्राधान्याच्या क्षेत्रांमध्ये सखोल संशोधनाला चालना मिळणार आहे.
NEET PG 2026 Result जाहीर; मागील ६ वर्षांच्या तुलनेत यंदा कट ऑफ सर्वात खाली!
सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि तांत्रिक स्वयंपूर्णतेशी संबंधित संशोधनालाही या उपक्रमामुळे बळ मिळणार आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्था, उद्योगातील संशोधन व विकास विभाग आणि सरकारी संशोधन प्रयोगशाळांसाठी प्रशिक्षित संशोधन मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होईल.
आयआयआयटी पुणे यांनी पात्रता निकष आणि विशेषीकरणाची क्षेत्रे यांसह अर्ज प्रक्रिया आपल्या अधिकृत https://www.iiitp.ac.in/ संकेतस्थळावर जाहीर केली आहे.