फोटो सौजन्य- सोशल मीडिया
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २३ जून २०२२च्या शासन निर्णयानुसार राज्यात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांचे सर्वेक्षण केले जाते. सर्वेक्षणात आढळणाऱ्या बालकांना त्यांच्या नजीकच्या शाळेत दाखल करून त्यांचे शिक्षण अखंडित ठेवण्यासाठी कार्यवाही केली जाते. मात्र, विविध कारणांमुळे अद्यापही मोठ्या प्रमाणात बालके शिक्षणापासून दूर असल्याचे निदर्शनास आले आहे.
NEET PG 2026 Result जाहीर; मागील ६ वर्षांच्या तुलनेत यंदा कट ऑफ सर्वात खाली!
बालके शिक्षणापासून दूर राहण्यापाठीमागे कौटुंबिक अडचणी, पालकांची आर्थिक परिस्थिती, शिक्षणाबाबतची अनास्था यांसह विविध कारणांमुळे काही बालके शाळेत दाखल होत नाहीत किंवा अनियमित राहतात. शहरांमधील रस्ते, रेल्वेस्थानके, एसटी बसस्थानके अशा ठिकाणीही शाळाबाह्य बालके आढळतात.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात इतर शासकीय यंत्रणांसोबत पोलिस प्रशासनाचे सहकार्य घेऊन सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आवाहन शिक्षण संचालकांनी केले आहे.






