Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIM मुंबईने सुरु केला नवा अभ्यासक्रम! निओ वेल्थ अँड ॲसेट मॅनेजमेंटची उद्योग क्षेत्रातील भागीदारी

भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) मुंबईने वित्तीय सेवा क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी 'एक्झिक्युटिव्ह एमबीए इन वेल्थ मॅनेजमेंट' हा एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. निओ वेल्थ अँड ॲसेट मॅनेजमेंटच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमात शैक्षणिक ज्ञानासह उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवावर भर देण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 22, 2026 | 06:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) मुंबईने वित्तीय सेवा क्षेत्रातील कार्यरत व्यावसायिकांसाठी ‘एक्झिक्युटिव्ह एमबीए इन वेल्थ मॅनेजमेंट’ हा एक वर्षाचा विशेष अभ्यासक्रम सुरू केला आहे. निओ वेल्थ अँड ॲसेट मॅनेजमेंटच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमाचे उद्घाटन १५ जुलै रोजी पवई येथील आयआयएम मुंबई कॅम्पसमध्ये झाले असून, १८ जुलैपासून वर्गांना सुरुवात झाली आहे. भारतातील वेल्थ मॅनेजमेंट क्षेत्राला समर्पित अशा मोजक्या अभ्यासक्रमांपैकी हा एक अभ्यासक्रम मानला जात आहे. ५२ आठवड्यांच्या वीकेंड सत्रांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या नॉन-रेसिडेन्शियल कार्यक्रमात शैक्षणिक ज्ञानासोबत उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवावरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे वित्तीय क्षेत्रातील व्यावसायिकांना कौशल्यवृद्धीची संधी मिळणार आहे.

Indian Army Recruitment: भारतीय सैन्यात परीक्षा न देता थेट अधिकारी बनण्याची संधी! ‘या’ सोप्या स्टेप्सद्वारे लगेच ऑनलाईन अर्ज करा

या अभ्यासक्रमात पोर्टफोलिओ व्यवस्थापन, जोखीम मूल्यांकन, कर नियोजन, इस्टेट प्लॅनिंग आणि बिहेव्हियरल फायनान्स यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. आयआयएम मुंबईचे प्राध्यापक अध्यापन करणार असून, निओ वेल्थ अँड ॲसेट मॅनेजमेंटसह उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञही विशेष सत्रांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

याशिवाय आयआयएम मुंबई आणि निओ वेल्थ अँड ॲसेट मॅनेजमेंट यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, वेल्थ मॅनेजमेंटविषयक मास्टरक्लासेस, केस स्टडीज, संशोधन आणि उद्योगविषयक ज्ञानाचा प्रसार डिजिटल माध्यमातून केला जाणार आहे. या उपक्रमामुळे उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

UPSC Recruitment 2026: संघ लोकसेवा आयोगामार्फत शिक्षण विभागात बंपर भरती! ‘या’ तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू

भारतामध्ये वाढणारी संपत्ती, गुंतवणुकीच्या बदलत्या संधी आणि वेल्थ अॅडव्हायजरी सेवांची वाढती मागणी लक्षात घेता या क्षेत्रात प्रशिक्षित व्यावसायिकांची गरज वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा अभ्यासक्रम वित्तीय क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Iim mumbai launches a new executive mba in wealth management program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • AIIMS Delhi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.