फोटो सौजन्य- सोशल मीडिया
UPSC Recruitment 2026: संघ लोकसेवा आयोगाने शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची घोषणा केली आहे. यूपीएससीतर्फे प्राचार्य आणि उपप्राचार्य या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सरकारी शाळांमध्ये प्राचार्य किंवा उपप्राचार्य बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. यासाठी लवकरच ऑनलाईन अर्जाची लिंक सक्रिय होणार असून पात्र उमेदवारांना अर्ज करता येईल.
यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर २५ जुलै २०२६ पासून प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपल पदांसाठी ऑनलाईन अर्जाचा फॉर्म उपलब्ध होईल. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करण्याची संधी मिळू शकते. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ८२८ पदे भरली जाणार आहेत, ज्यामध्ये प्रिन्सिपलसाठी १२४ पदे आणि व्हाईस प्रिन्सिपलसाठी ७०४ पदे निश्चित करण्यात आली आहेत.
ज्या उमेदवारांकडे मास्टर्स पदवी आहे किंवा बी.एड. सोबत PGT किंवा TGT शिक्षक म्हणून शिकवण्याचा अनुभव आहे, ते प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपल पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी पात्रतेबद्दल अधिक सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत अधिसूचना नक्की वाचावी.
प्रिन्सिपल (प्राचार्य) पद: जनरल आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ५० वर्षे, OBC प्रवर्गासाठी ५३ वर्षे आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
व्हाईस प्रिन्सिपल (उपप्राचार्य) पद: जनरल आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे, OBC प्रवर्गासाठी ३८ वर्षे आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४० वर्षे वयोमर्यादा निश्चित केली आहे.
१. सर्वप्रथम यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला upsc.gov.in भेट द्या.
२. मुख्य पानावर आधी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
३. यानंतर भरतीशी संबंधित सक्रिय लिंकवर क्लिक करा.
४. अर्जात मागितलेली सर्व वैयक्तिक व शैक्षणिक माहिती व्यवस्थित भरा.
५. सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन प्रती सबमिट करा. ६. शेवटी अर्ज शुल्काचा भरून अर्जाची एक प्रिंट काढून ठेवा.






