Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIRF Rankings 2026: इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचाय? मग पहा भारतातील ‘या’ टॉप १० प्रायव्हेट कॉलेजेसची ताजी रँकिंग यादी एकदा वाचाच..

IIRF Rankings 2026: भारतातील सर्वोत्तम खासगी इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणते आहेत? यंदाच्या IIRF रँकिंगमध्ये बिट्स पिलानीनंतर कोणत्या संस्थांनी बाजी मारली आहे? शैक्षणिक दर्जा आणि प्लेसमेंटमध्ये अव्वल ठरलेल्या टॉप १० कॉलेजेसची यादी वाचा सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 24, 2026 | 12:09 PM
iirf

iirf

Follow Us
Follow Us:

IIRF Rankings 2026: IIRF रँकिंगची या वर्षीची यादी जाहीर झाली असून यामध्ये भारतातील टॉप शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. यंदा या रॅंकिंगमध्ये पहिला क्रमांक ‘बिट्स पिलानी’ला (BITS Pilani) म्हणजेच ‘बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स’ला मिळाला आहे. या संस्थेचा असा रेकॉर्ड आहे की, इथून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणारे विद्यार्थी नेहमीच बड्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम करतात. याच कारणामुळे ही संस्था अनेक वर्षांपासन आपले अव्वल स्थान टिकवून आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा विचार केल्यास तामिळनाडूतील दोन मोठ्या संस्थांनी या स्थानांवर बाजी मारली आहे. दुसऱ्या स्थानावर चेन्नई येथील SRM इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने तर तिसऱ्या स्थानावर वेल्लोर येथील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (VIT) आपले स्थान निश्चित केले आहे. तसेच, या दोन्ही कॉलेजेसमध्ये अभ्यासासोबतच कॅम्पस लाईफ आणि आंतरराष्ट्रीय अनुभवावरही विशेष भर दिला जातो. यामुळेच हे कॉलेजेस रँकिंगमध्ये पहिल्या ३ मध्ये गणले जातात.

४ थ्या ते ७ व्या क्रमांकावरील संस्था कोणत्या?

चौथे स्थान: कर्नाटकच्या मणिपाल येथील ‘मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन’ने (MAHE) पटकावले आहे. ही संस्था इंजिनिअरिंगसोबतच वैद्यकीय क्षेत्रातही आपली वेगळी ओळख राखून आहे.

पाचवे स्थान: पंजाबमधील पटियाला शहरात असणारे ‘थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ पाचव्या क्रमांकावर आहे, जे आपल्या मजबूत टेक्निकल बेस आणि इंडस्ट्री टाई-अपसाठी (उद्योगांशी भागीदारी) ओळखले जाते.

‘SSC CGL’च्या उमेदवारांना मोठा दिलासा! अर्ज करण्याची मुदत वाढवली; जाणून घ्या नवीन तारीख

सहावे स्थान: गुजरातच्या गांधीनगरमधील ‘धीरूभाई अंबानी युनिव्हर्सिटी’ने सहावे स्थान मिळवले असून, तेलंगणातील IIIT हैदराबाद हे सातव्या क्रमांकावर आहे. संगणक विज्ञान तंत्रज्ञान संशोधनाच्या बाबतीत हे देशातील सर्वोत्तम संस्थांपैकी एक मानले जाते.

८ व्या ते १० व्या स्थानावरील संस्था

आठवे स्थान: आठव्या स्थानावर उत्तर प्रदेशातील शिव नाडर डीम्ड युनिव्हर्सिटी आणि गाझियाबादची KIET डीम्ड युनिव्हर्सिटी या दोन संस्थांनी बाजी मारली आहे. आधुनिक पायाभूत सुविधा आणि वाढत्या प्लेसमेंट रेकॉर्डमुळे या दोन्ही संस्था विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत.

नववे स्थान: बेंगळुरूचे IIIT बेंगळुरू नवव्या स्थानावर आहे तर अंतिम म्हणजेच दहाव्या स्थानावर झारखंडच्या मेसरा येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मेसराने जागा मिळवली आहे. ही संस्था आपल्या जुन्या इतिहासासाठी आणि उत्तम शैक्षणिक दर्जासाठी ओळखली जाते.

IIT Placement 2026: नोकरीची ऑफर रद्द करणाऱ्या कंपन्यांना आयआयटीचा दणका; ३ महिन्यांचा पगार द्या, नाहीतर थेट ‘बॅन’

वर्ष २०२६ मध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही IIRF रँकिंग एका मार्गदर्शकासारखे काम करते. ही यादी तयार करताना शैक्षणिक दर्जा, संशोधनाचे वातावरण, उद्योगांशी असलेले संबंध आणि करिअरच्या संधी यांसारख्या महत्त्वाच्या घटकांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.

Web Title: Iirf rankings 2026 top engineering private colleges list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Birla College
  • Dhirubhai Ambani
  • education
  • Engineering College

संबंधित बातम्या

Mojtaba Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई नेमके कोण आहेत? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी एका क्लिकवर..
1

Mojtaba Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई नेमके कोण आहेत? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी एका क्लिकवर..

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? परदेशातील ‘या’ ५ प्रमुख देशांमधून MBBS केल्यानंतर भारतात थेट मिळेल प्रॅक्टिस करण्याचा अधिकार!
2

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? परदेशातील ‘या’ ५ प्रमुख देशांमधून MBBS केल्यानंतर भारतात थेट मिळेल प्रॅक्टिस करण्याचा अधिकार!

Study Abroad : परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भारतात परतण्याचे कारण काय ? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा..
3

Study Abroad : परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भारतात परतण्याचे कारण काय ? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा..

Best Time to Study: अभ्यासासाठी कोणती वेळ सर्वोत्तम? पहाटे की रात्री? जाणून घ्या एका क्लिकवर..
4

Best Time to Study: अभ्यासासाठी कोणती वेळ सर्वोत्तम? पहाटे की रात्री? जाणून घ्या एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.