Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sahil Vakode Suicide Case: चॅटजीपीटीमुळे घात की जातीचा पाश? आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर खळबळ!

IIT Bombay Student Sahil Vakode Suicide Case : साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी आयआयटी प्रशासनाने १० सदस्यांची एक विशेष समिती स्थापन केली असून, एका आठवड्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 23, 2026 | 02:34 PM
sahil wakode

sahil wakode

Follow Us
Follow Us:

IIT Bombay Student Sahil Vakode Suicide Case : आयआयटी बॉम्बेमधील बी.टेक द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी आयआयटी प्रशासनाने १० सदस्यांची एक विशेष समिती स्थापन केली असून, एका आठवड्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना रजेवर पाठवण्यात आले आहे, जेणेकरून तपासात निष्पक्षता राहील.

मुंबई क्राईम ब्रांचने वाढवला तपासाचा वेग; नोंदवले जबाब

मामल्याचे गांभीर्य लक्षात घेून मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने आपला कायदेशीर तपास अधिक तीव्र केला आहे. पोलीस पथकाने साहिल वाकोडे याचे आई-वडील तसेच परीक्षा हॉल आणि हॉस्टेलमध्ये त्याच्यासोबत असणाऱ्या वर्गमित्रांचे जबाब नोंदवले आहेत. लवकरच आयआयटी बॉम्बेचे इतर प्राध्यापक, प्राध्यापक वर्ग आणि प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांचेही जबाब नोंदवले जातील, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

मृत साहिलच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवली असून, त्यामध्ये प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला आणि इतर अधिकाऱ्यांची नावे समाविष्ट आहेत. या एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहितेअंतर्गत (BNS) आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. प्रकरणाची संवेदनशीलतेने पडताळणी करण्यासाठी हा तपास पवई पोलिसांकडून मुंबई पोलीस क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला असून, पोलीस आता सर्व आरोपांची सखोल चौकशी करत आहेत.

IIM मध्ये मोठा बदल! UG कोर्सेससाठी होणार एकच ‘कॉमन एंट्रन्स टेस्ट’; RTI मधून मोठा खुलासा

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आयआयटी बॉम्बेमध्ये साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. परीक्षेदरम्यान चॅटजीपीटीचा वापर करून कॉपी करताना तो पकडला गेल्याचा दावा आयआयटी प्रशासनाने केला होता. यानंतर बी.टेक द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल शुक्रवारी संध्याकाळी पवई कॅम्पसमधील हॉस्टेलच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. या घटनेच्या काही तासांपूर्वीच परीक्षेदरम्यान प्राध्यापक डुल्ला यांनी साहिलला मोबाईलचा वापर करताना पकडले होते.

Best College Rankings 2027: सलग १५ वर्षांची बादशाही संपली! प्रिन्स्टनला पछाडत ‘ही’ युनिव्हर्सिटी बनली अमेरिकेतील नंबर १

दुसरीकडे, मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांत प्राध्यापक सदस्याविरोधात तक्रार दाखल करत जातीवर आधारित छळाचा आरोप केला आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करत संचालकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. विद्यार्थ्यांसोबत झालेल्या बैठकीत केदारे यांनी विद्यार्थ्यांच्या १८ मागण्यांचे सनद स्वीकारले असून संस्था त्यावर गांभीर्याने विचार करेल, असे आश्वासन दिले आहे.

Web Title: Iit bombay student sahil vakode suicide case probe committee formed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • education
  • IIT Bombay

संबंधित बातम्या

Best College Rankings 2027: सलग १५ वर्षांची बादशाही संपली! प्रिन्स्टनला पछाडत ‘ही’ युनिव्हर्सिटी बनली अमेरिकेतील नंबर १
1

Best College Rankings 2027: सलग १५ वर्षांची बादशाही संपली! प्रिन्स्टनला पछाडत ‘ही’ युनिव्हर्सिटी बनली अमेरिकेतील नंबर १

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
2

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

IIM मध्ये मोठा बदल! UG कोर्सेससाठी होणार एकच ‘कॉमन एंट्रन्स टेस्ट’; RTI मधून मोठा खुलासा
3

IIM मध्ये मोठा बदल! UG कोर्सेससाठी होणार एकच ‘कॉमन एंट्रन्स टेस्ट’; RTI मधून मोठा खुलासा

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास
4

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.