Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ITI मधील अनुभवी तासिका निदेशकांसाठी, मंत्री मंगल प्रभात लोढांचा महत्वाचा निर्णय

औद्योगिक प्रशिक्षण विभागाअंतर्गत केल्या गेलेल्या 1 हजार 457 पदांचा भरतीमुळे अनुभवी तासिका निदेशकांना कामावरून कमी करण्यात आले होते. त्यांसाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 24, 2024 | 06:15 PM
फोटो सौजन्य- X

फोटो सौजन्य- X

Follow Us
Follow Us:

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील अनुभवी तासिका तत्त्वावरील निदेशकांना विभागाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने समायोजन करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे कौशल्य, रोजगार,  उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले आहे. औद्योगिक प्रशिक्षण विभागाअंतर्गत केल्या गेलेल्या 1 हजार 457 पदांचा भरतीमुळे अनुभवी तासिका निदेशकांना कामावरून कमी करण्यात आले होते.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार आयोजित बैठकीत ते बोलत होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील अनुभवी तासिका निदेशकांना कंत्राटी सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी कौशल्य विकास विभागाने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केली होती.

हे देखील वाचा-भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयामध्ये भरतीला सुरुवात; विविध पदांसाठी होणार उमेदवारांची नियुक्ती

कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा यांच्या दालनात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत मागणीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी वन मंत्री श्री. मुनगंटीवार, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, व्यवसाय व शिक्षण मंडळाचे संचालक सतीश सूर्यवंशी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व महाराष्ट्र राज्य आय. टी. आय. निदेशक संघाचे अध्यक्ष अनिलकुमार होटकर, यांच्यासह रूपेश तायडे, प्रशांत भोंडवे, रोहन सराफ आदि पदाधिकारी उपस्थित होते.

कौशल्य विकास विभागाकडून  प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, तासिका तत्त्वावरील अनुभवी निदेशकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देणे हा धोरणात्मक निर्णय आहे. यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी या विषयाच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळासमोर हा विषय सादर करण्यात येईल. कौशल्य विकास विभाग हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा-पीएच.डी करणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती मिळणार, विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

अनुभवी तासिका निदेशकांना विभागांतर्गत कंत्राटी पद्धतीने सामावून घेण्यात यावे

वन मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील गेल्या अनेक वर्षांपासून अल्प मानधनात लोकांनी काम केले आहे. मात्र विभागाअंतर्गत केल्या गेलेल्या 1 हजार 457 पदांचा भरतीमुळे अनुभवी तासिका निदेशकांना कामावरून कमी करण्यात आले असून त्यांचावर बेरोजगारीची वेळ आलेली आहे. अशा अनुभवी तासिका निदेशकांना विभागांतर्गत कंत्राटी पद्धतीने सामावून घेण्यात यावे. तसेच याबाबतीत विशेष धोरण अंवलंबून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आय.टी.आय.निदेशक संघाने केली होती. याबाबतीत कौशल्य विकास विभागाने सकारात्मक पावले उचलून मंत्रीमंडळाची याबाबीसाठी मान्यता घ्यावी, अशा सूचना वन मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी केला.

Web Title: Important decision of minister mangal prabhat lodha for experienced hourly directors in iti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 06:15 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Sudhir Mungantiwar

संबंधित बातम्या

‘आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय…’; TET पेपरफुटीवरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर; भर अधिवेशनात फटकारलं
1

‘आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय…’; TET पेपरफुटीवरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर; भर अधिवेशनात फटकारलं

‘बीएलओ मशिदींमध्ये जाऊन एका विशिष्ट समाजातील…’; Mangal Prabhat Loadha यांची तक्रार
2

‘बीएलओ मशिदींमध्ये जाऊन एका विशिष्ट समाजातील…’; Mangal Prabhat Loadha यांची तक्रार

‘किंग एडवर्ड हा कसाब सारखा…’; विधानपरिषदेत Mangal Prabhat Lodha विरोधकांवर भडकले
3

‘किंग एडवर्ड हा कसाब सारखा…’; विधानपरिषदेत Mangal Prabhat Lodha विरोधकांवर भडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.