Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणांसाठी मोठी बातमी! १०० कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू होणार; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते शुभारंभ

Mangal Prabhat Lodha: नामांकित सामाजिक, शैक्षणिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून प्रशिक्षण केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. स्थानिक संस्था, उद्योग आणि शासन यांच्या समन्वयातून स्थानिक युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच उद्योगांसाठी कौशल्याधारित मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 05, 2026 | 08:11 PM
उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

Follow Us
Follow Us:

प्रशिक्षणासाठी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही
कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शुभारंभ
कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांना रोजगारक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याचा शासनाचा संकल्प

मुंबई/Mangal Prabhat Lodha: आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आणि स्पर्धात्मक युगात युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी कौशल्य विकासावर भर देण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास विभागाने ‘महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ योजना सुरू केली आहे. गुरुवारी मेट्रो चौक येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल आवारातील दक्ष हॉल येथे महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य विकास योजनेचे ऑनलाईन उद्घाटन संपन्न झाले. या योजनेचा शुभारंभ कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेंतर्गत केवळ ३०० चौ. फुटांच्या जागेत कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात राज्यातील १०० केंद्रांना प्रायोगिक तत्त्वावर मान्यता देण्यात आली. त्यापैकी १२ केंद्रांचे उद्घाटन झाले. या उपक्रमाच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण गावागावांत आणि वस्तीवस्तीपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र हा भारतातील पहिला उपक्रम आहे. राज्यातील झोपडपट्टी, दुर्गम, डोंगराळ, नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागांतील गरजू युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत (PMKUVA) कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी जागेच्या निकषांमध्ये शिथिलता देण्यात आली असून, आता किमान ३०० ते १५०० चौरस फूट जागेतही प्रशिक्षण केंद्र सुरू करता येणार आहे. नागपुर, डहाणू-पालघर, नंदुरबार, यवतमाळ, पुणे, मुंबई, सिंधुदूर्ग आणि जळगाव या जिल्ह्यात १२ केंद्रांचे उद्घाटन झाले.

‘…त्यांची बुद्धी किती आहे, हे दिसून आले’; मल्लिकार्जुन खरगेंवर Mangal Prabhat Lodha यांचा निशाणा

दरम्यान, २०२६ हे वर्ष क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. याचे औचित्य साधून, या अभियानांतर्गत स्थापन होणाऱ्या सर्व कौशल्य विकास केंद्रांना ‘महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ असे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त त्यांच्या गावी ह्या उपक्रमाची घोषणा केली. महात्मा फुले यांच्या व्यावसायिक शिक्षणाच्या विचारांना अनुसरून युवकांना आधुनिक बाजारपेठेच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण देणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे, असेही लोढा यांनी सांगितले.

मंत्री मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले की, यापूर्वी कौशल्य प्रशिक्षण केंद्रांसाठी मोठ्या जागेची आवश्यकता होती. मात्र, आता किमान ३०० चौ. फुटांच्या जागेत प्रशिक्षण केंद्र सुरू करता येणार असल्याने स्थानिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. उपलब्ध स्थानिक पायाभूत सुविधांचा प्रभावी उपयोग करून कौशल्य प्रशिक्षणाचा विस्तार करणे शक्य होणार आहे. विशेषतः झोपडपट्ट्या, झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रे, दुर्गम आणि डोंगराळ भाग, नक्षलग्रस्त क्षेत्रे, आदिवासी भाग तसेच ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य प्रशिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. गावठाण, आकांक्षित जिल्हे आणि तालुक्यांपर्यंत प्रशिक्षण सुविधा पोहोचवून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना रोजगारक्षम बनविण्याचा शासनाचा मानस आहे.

आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या व्हिजनप्रमाणे गावागावातील युवा कौशल्यसंपन्न व्हायला हवा, कारण हेच युवा विकसित भारताची खरी शक्ती आहेत. हेच व्हिजन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आम्ही कार्यरत आहोत. याच प्रवासातील आज एक महत्त्वाचा टप्पा आपण पार केला आहे. केवळ ३०० स्क्वेअर फूट जागेत उभारण्यात आलेल्या भारतातील पहिल्या १२ महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्रांचे आज उद्घाटन केले. विशेष म्हणजे, खेड्यापाड्यांत, वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, आदिवासी भागांत आणि अतिशय दुर्गम ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. युवकांना रोजगारक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने राज्यातील १०० केंद्रांना मान्यता देण्यात आली असून, ही १२ केंद्रे त्याचाच एक भाग आहेत. या केंद्रांमध्ये उद्योगांच्या गरजेनुसार रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रशिक्षणासाठी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २००व्या जयंतीनिमित्त आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या केंद्रांच्या स्थापनेची घोषणा केली होती. आज ही घोषणा प्रत्यक्षात साकार होत आहे, याचा आनंद आहे. नागपूर, सिंधुदुर्ग, पुणे, डहाणू, पालघर, यवतमाळ, आंबेगाव, देवगड, जळगाव, नंदुरबार आणि मुंबई अशा विविध ठिकाणी या केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. @narendramodi @Dev_Fadnavis
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai
@BJP4India
#SkillIndia #YouthEmpowerment #EmploymentGeneration #Maharashtra #DevendraFadnavis #NarendraModi — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) November 5, 2026

या केंद्रांमध्ये उद्योगांच्या गरजेनुसार रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रशिक्षण, कौशल्य प्रमाणपत्र आणि रोजगार यांची परिणामकारक सांगड घालण्यावर भर देण्यात येणार असून, प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असेही मंगलप्रभात लोढा म्हणाले.

याप्रसंगी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे आयुक्त डॉ. अमित सैनी, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपुर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सुर्यवंशी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Mangal Prabhat Lodha: विद्यार्थ्यांनो, तुमच्या कल्पनांना मिळणार नवी दिशा! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी…

उद्योगासाठी कौशल्याधारित मनुष्यबळ तयार करण्यावर भर

नामांकित सामाजिक, शैक्षणिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून प्रशिक्षण केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. स्थानिक संस्था, उद्योग आणि शासन यांच्या समन्वयातून स्थानिक युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच उद्योगांसाठी कौशल्याधारित मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे.

कौशल्यसंपन्न, रोजगारक्षम आणि आत्मनिर्भर युवा घडविणे

ग्रामीण आणि शहरी भागातील कौशल्य प्रशिक्षणाच्या उपलब्धतेतील तफावत कमी करणे, आर्थिक समावेशनाला चालना देणे आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून युवकांना आत्मनिर्भर बनविणे, हा या योजनेचा व्यापक दृष्टिकोन आहे. केवळ प्रशिक्षण केंद्रे सुरू करणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून, कौशल्यसंपन्न, रोजगारक्षम आणि आत्मनिर्भर युवा महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मंत्री लोढा यांच्या हस्ते कोणत्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला?

    Ans: मंत्री लोढा यांच्या हस्ते ‘महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

  • Que: कौशल्य विकास योजनेचे ऑनलाईन उद्घाटन कुठे पार पडले?

    Ans: कौशल्य विकास योजनेचे ऑनलाईन उद्घाटन एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल आवारातील दक्ष हॉल येथे झाला.

Web Title: Mangal prabhat lodha start 100 skill development center scheme in mumbai maharashtra tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News
  • New employment
  • Skill Development

संबंधित बातम्या

ऐन दिवाळीत प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड; खासगी बसच्या तिकिटांत मोठी वाढ, 1100 चे तिकीट…
1

ऐन दिवाळीत प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड; खासगी बसच्या तिकिटांत मोठी वाढ, 1100 चे तिकीट…

आमदार नरेंद्र मेहतांच्या मागणीला यश! मिरा-भाईंदरच्या वाहतूक आयुक्तालयांतर्गत स्वतंत्र पोलीस उपायुक्त पदाला शासनाची मंजुरी
2

आमदार नरेंद्र मेहतांच्या मागणीला यश! मिरा-भाईंदरच्या वाहतूक आयुक्तालयांतर्गत स्वतंत्र पोलीस उपायुक्त पदाला शासनाची मंजुरी

Mumbai News: वायुप्रदूषणावरून सदस्य प्रचंड आक्रमक! नेमलेले भरारी पथक कुचकामी ठरत असल्याचा आरोप
3

Mumbai News: वायुप्रदूषणावरून सदस्य प्रचंड आक्रमक! नेमलेले भरारी पथक कुचकामी ठरत असल्याचा आरोप

Mumbai News :घरगुती पाहुणचारात वाढतोय प्रीमियम फूड डिलिव्हरीचा ट्रेंड; खास प्रसंगांसाठी रेस्टॉरंट्सच्या जेवणाला पसंती
4

Mumbai News :घरगुती पाहुणचारात वाढतोय प्रीमियम फूड डिलिव्हरीचा ट्रेंड; खास प्रसंगांसाठी रेस्टॉरंट्सच्या जेवणाला पसंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.