फोटो सौजन्य - Social Media
सांस्कृतिक मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सांस्कृतिक मंत्रालयातील विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांची नेमणूक केली जाणार आहे. मुद्दा सांस्कृतिक मंत्रालयासंदर्भात असल्यामुळे अटी शर्तींचा बहुमार आहे. उमेदवारांना अनेक अटी शर्तीचे पालन करून त्यांना पात्र करावे लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या संदर्भात सखोल माहितीचा आढावा घेण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घ्यावा.
हे देखील वाचा : भारतीय पूर्व रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी नियुक्तीला सुरुवात; रेल्वे रिक्रुटमेंट सेलची बंपर भरती
इच्छुक उमेदवारांना असलेल्या या भरती संदर्भातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे या अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. उमेदवारांना या भरतीमध्ये अर्ज नोंदवता येणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी ccrtindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. अधिसूचनेमधील मानदंडांना पूर्ण करणे उमेदवारांना अनिवार्य आहे, अन्यथा अर्ज फेटाळले जाईल. या भरती प्रक्रियेमध्ये विविध विभागातील रिक्त पदांचा विचार केला जात आहे. यामध्ये लेख अधिकारी ग्रुप बी पदासाठी ४ पदे आहेत, प्रशासकीय अधिकारी पदासाठी १ रिक्त जागा, व्हिडीओ एडिटर, डॉक्युमेंट सहाय्यक आणि हिंदी ट्रान्स्लेटर पदासाठी प्रत्येकी १ जागा रिक्त आहेत.
या भरतीमध्ये हिंदी भाषेतील १ कॉपी एडिटर तर इंग्रजी भाषेसाठी १ कॉपी एडिटरची नियुक्ती केली जाणार आहे. शिल्पकला आणि समन्वयक, लेख लिपिक तसेच डेटा एंट्री ऑपरेटरच्या पदासाठी प्रत्येकी २ पदे रिक्त आहेत. लोअर डिव्हिजन क्लर्कच्या पदासाठी ६ जागा रिक्त असून यातील ३ पदे अनारक्षित आहेत, १ जागा OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी, १ जागा SC तर १ जागा EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी आरक्षित आहे.
हे देखील वाचा : SPJIMR कडून पीजीडीएम आणि पीजीडीएम (बीएम) प्रोग्राम्ससाठी अर्ज प्रक्रिया सुरू
या भरती संदर्भात काही महत्वाच्या बाबी आहेत, ज्यांना लक्षात घेणे आवश्यक आहे. केंद्र किंवा राज्य सरकार, स्वायत्त संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उमेदवारांनी योग्य माध्यमातून अर्ज करावा. निवड प्रक्रियेदरम्यान ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देखील द्यावे लागेल. ईमेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील. अर्जामध्ये आवश्यक त्या सगळ्या कागदपत्रांची आणि योग्य स्वाक्षरीची पूर्तता झाली असावी. निवडलेल्या उमेदवारांची नवी दिल्लीतील CCRT मुख्यालयात किंवा त्याच्या कोणत्याही प्रादेशिक केंद्रावर नियुक्ती केली जाऊ शकते. दिव्यांग वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात येईल.