
Image
Income Tax Bharti Sports Quota 2026: जर तुम्ही क्रीडा क्षेत्राशी जोडलेले असाल आणि देशातील सर्वात प्रतिष्ठित विभागांपैकी एक असलेल्या आयकर विभागात सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आयकर विभाग दिल्ली क्षेत्राने गुणवंत खेळाडूंसाठी क्रीडा कोट्याअंतर्गत ११९ रिक्त पदांवर भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
या भरती मोहिमेद्वारे एकूण ११९ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये मल्टी-टास्किंग स्टाफसाठी ६६ पदे, टॅक्स असिस्टंटसाठी ४४ पदे आणि स्टेनोग्राफर ग्रेड-II साठी ०९ पदांचा समावेश आहे. पात्रतेचा विचार केल्यास, एमटीएस पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास असावा आणि वय १८ ते २५ वर्षांदरम्यान असावे. स्टेनोग्राफर ग्रेड-II साठी १२ वी पास असणे आवश्यक असून वय १८ ते २७ वर्षे असावे, तसेच निवडीनंतर स्टेनोग्राफी टेस्ट द्यावी लागेल. टॅक्स असिस्टंट पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक असून वय १८ ते २७ वर्षे असावे, तसेच निवडीनंतर डेटा एंट्री स्किल टेस्ट घेतली जाईल.
क्रीडा पात्रतेसाठी उमेदवाराने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे किंवा राष्ट्रीय/आंतर-विद्यापीठ स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या राज्याचे किंवा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. आरक्षित वर्ग आणि खेळाडूंना नियमानुसार उच्च वयोमर्यादेत ५ ते १० वर्षांपर्यंत सूट दिली जाईल. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जात आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळेल. ज्यामध्ये टॅक्स असिस्टंट आणि स्टेनोग्राफर पदासाठी पे लेव्हल-४ (रु. २५,५०० ते रु. ८१,१० वरती प्रति महिना) आणि एमटीएस पदासाठी पे लेव्हल-१ (रु. १८,००० ते रु. ५६,९०० प्रति महिना) वेतन दिले जाईल. या भरतीसाठी कोणतीही लिखित परीक्षा घेतली जाणार नाही; उमेदवारांची निवड त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरी, शैक्षणिक पात्रता, वय आणि आवश्यकतेनुसार स्किल टेस्टच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीद्वारे केली जाईल.
इच्छुक आणि पात्र खेळाडू आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत आपला ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. अर्ज करताना स्पोर्ट्स सर्टिफिकेट्स, शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
Ans: या भरती प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२६ आहे.
Ans: या भरतीद्वारे एकूण ११९ पदे भरली जाणार आहेत— मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS: ६६ पदे), टॅक्स असिस्टंट (Tax Assistant: ४४ पदे) आणि स्टेनोग्राफर ग्रेड-II (Stenographer: ०९ पदे)