खेर्डीतील कारखान्याला आग (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)
३ अग्निशामक बंबांची घेतली मदत
फर्निचर तयार करण्यासाठी मालानी यांनी सुमारे ४ कोटी खर्चाच्या १२ मशिनरी परदेशातून आयात केल्या होत्या. घरासाठी वापरण्यात येणारे सर्व प्रकारचे फर्निचर येथे तयार केले जात होते. नामवंत कंपन्यांचे तयार फर्निचर देखील विक्रीस ठेवले होते. बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कंपनी बंद झाल्यानंतर सर्व कामगार निघून केले.
Ganesh Idol Factory Fire: वाई MIDCमध्ये गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक
साधारणतः ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास कंपनीस आग लागल्याची माहिती मालानी-फजलानी यांना मिळाली. तेथून चिपळूण पालिकेसह लोटेतील अग्नीशमक बंबास पाचारण करण्यात आले. बंब येईपर्यंत आग वाढतच गेली. मदत कार्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात जमले होते. मात्र, कंपनीच्या दोन्ही बाजूस बांधकामे असल्याने मदत कार्यास अडचणी येत होत्या. ३ अग्नीशमक बंबाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. रात्री एक वाजता आग आटोक्यात आली. परंतू कंपनीत लाकडाचे साहित्य अधिक आणि भसा जास्त असल्याने आग पन्हा पन्हा धमसत होती.
लोखंडी साहित्य वगळता कंपनीत काहीच शिल्लक राहिले नाही
गुरूवारी पहाटे ५ पर्यंत बंबाच्या साह्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, सकाळी साडेनऊच्या दरम्यान पुन्हा आग भडकली. अर्धवट जळालेले साहित्य पुन्हा जळत होते. साडेदहाच्या सुमारास चिपळूण पालिका आणि लोटेतील अग्नीशमक बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यात आली. ५ वर्षापूर्वी ही फर्निचर कंपनी सुरू झाली. कंपनी इमारतीच्या शेडसाठी हेव्ही लोखंडी चिम टाकण्यात आले होते. मात्र, आगीच्या तडाक्यात हे बिम देखील गरम होऊन वाकले होते. लोखंडी साहित्य वगळता कंपनीत काहीच शिल्लक राहिले नव्हते.






