IND vs WI: शुभमनला झाली जखम (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
शुभमन गिल यामुळे अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ मैदानाबाहेर होता आणि त्यानंतर तो परत येऊन खेळलादेखील नाही. त्यामुळे आता पहिला सामना शुभमन गिल खेळू शकणार की नाही असे प्रश्नचिन्ह सर्वांसमोर उपस्थित झाले आहे. नेमकी स्थिती काय आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र असं झाल्यास नक्की भक्कम वेस्ट इंडिजसमोर भारतासाठी खेळ हा डोकेदुखी ठरू शकतो.
IND Vs WI: रविवार होणार थरारक! भारत अन् वेस्ट इंडिज भिडणार? कुठे आणि किती वाजता सुरू होणार सामना?
शुभमन गिलला लागलेल्या या चेंडूनंतर तो खेळणार की नाही हाच एक प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे. Cricbuzz ने दिलेल्या अहवालानुसार, शुभमनला लागल्यानंतर तो नेट्समध्ये पुन्हा खेळताना दिसला नाही, मात्र त्याने या दरम्यान खेळाडूंशी संपर्क आणि संवाद साधला आणि आईस पॅकशिवाय तो फिरताना दिसला. यामुळे त्याची जखम जास्त गंभीर नसावी असा अंदाज काढला जात आहे आणि याशिवाय तो पहिल्या सामन्यात नक्कीच कर्णधारपद भूषवेल असंही म्हटलं जात आहे.
२०२६ मध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वात यशस्वी असा शुभमन गिलचा प्रवास राहिला आहे. त्याने यावर्षी ९ सामन्यात ८ वेळा खेळताना उत्तम प्रदर्शन करत ९३.५० च्या सरासराने ५६१ धावा काढल्या आहेत आणि त्यामध्ये एक शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
सरावादरम्यान यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली हेदेखील २० मिनिट्सपर्यंत एकत्र नेट्समध्ये सराव करताना दिसले. अफगाणिस्तानविरूद्ध घरच्या मैदानावर विराट कोहली खेळू शकला नाही. तर दोन्ही फलंदाज सध्या फॉर्ममध्ये असल्याचं म्हटलं जातंय. सरावादरम्यान स्थानिक खेळाडूंसह दोघांनीही अत्यंत सफाईने खेळल्याचं पाहिलं गेलं. रोहित शर्माने आपल्या मागील सामन्यात लॉर्ड्सवर शतक खेळून ऐतिहासिक रेकॉर्ड केला होता. तर हाच फॉर्म यावेळीदेखाील दिसून येईल अशी अपेक्षा चाहते बाळगत आहेत.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड़, केएल राहुल (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जयसवाल, नमन धीर, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज आणि औकिब नबी






