Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air Force Recruitment: भारतीय वायुसेनेत ‘अग्निवीर’ होण्याची सुवर्णसंधी; पात्रता आणि अटी वाचा एका क्लिकवर..

Air Force Recruitment: भारतीय वायुसेनेने 'अग्निवीर वायू भरती इनटेक ०२/२०२७' ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. १२ वी उत्तीर्ण आणि डिप्लोमा धारक अविवाहित उमेदवारांसाठी अर्ज करण्याची पात्रता, वयोमर्यादा व शारीरिक अटींची माहिती जाणून घ्या सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 07, 2026 | 01:11 PM
agniveer

agniveer

Follow Us
Follow Us:

IAF Agniveer Air Force Recruitment:  भारतीय वायुसेनेने (IAF) अग्निपथ योजनेअंतर्गत ‘अग्निवीर वायू भरती इनटेक ०२/२०२७’ ची अधिकृत जाहिरात (Notification) प्रसिद्ध केली आहे. यासाठी ६ जुलैपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २६ जुलै आहे. वायुसेनेत अग्निवीर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. जाहिरातीनुसार, या भरतीसाठी उमेदवारांचा जन्म १ जुलै २००५ ते १ जानेवारी २०१० या कालावधीत झालेला असावा.

‘अग्निवीर वायू’ची ही भरती लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी (Physical Test) आणि वैद्यकीय तपासणी (Medical Test) या आधारावर केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची ४ वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली जाईल आणि त्यांना प्रतिमहिना ३० हजार रुपये पगार मिळेल.

अग्निवीर वायू भरतीसाठी पात्रता

वयोमर्यादा: उमेदवारांचा जन्म १ जुलै २००५ ते १ जानेवारी २०१० दरम्यान झालेला असावा.

वैवाहिक स्थिती: अर्जदार अविवाहित असणे अनिवार्य आहे.

शैक्षणिक पात्रता (विज्ञान शाखा): उमेदवार भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), गणित (Mathematics) आणि इंग्रजी (English) या विषयांसह १२ वी उत्तीर्ण असावा. १२ वीमध्ये किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे, तसेच इंग्रजी विषयातही स्वतंत्रपणे ५० टक्के गुण असणे गरजेचे आहे.

डिप्लोमा धारक: ज्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल / कॉम्प्युटर सायन्स / इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) पूर्ण केला आहे, ते देखील अर्ज करू शकतात. यामध्ये एकूण ५० टक्के गुण आणि इंग्रजी विषयातही ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

MBA Career Options: पदवीनंतर एमबीए करायचंय? ‘या’ ८ स्ट्रीममध्ये स्पेशलायझेशन करून मिळवा कोट्यवधींचे पॅकेज

इतर शाखा: १२ वी आर्ट्स (Arts) आणि कॉमर्स (Commerce) शाखेचे विद्यार्थी देखील यासाठी अर्ज करू शकतात. यामध्येही एकूण ५० टक्के गुण आणि इंग्रजी विषयात ५० टक्के गुण असावेत. यासोबतच २ वर्षांचा व्होकेशनल कोर्स (Vocational Course) पूर्ण केलेला असावा, ज्यामध्ये एकूण ५० टक्के गुण आणि इंग्रजीत ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे.

शारीरिक पात्रता

उंची (Height): पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांसाठी किमान १५२.५ सेमी असणे आवश्यक आहे. ईशान्य भारत (North East) आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागातील रहिवाशांसाठी ही मर्यादा १४७ सेमी, तर लक्षद्वीपच्या उमेदवारांसाठी १५० सेमी आहे.

Job Interview Tips: इंग्रजीमुळे जॉब इंटरव्यूची भीती वाटतेय? घरबसल्या ‘या’ ५ सोप्या टिप्स फॉलो करा; मिळवा पहिल्याच प्रयत्नात यश

छाती (Chest): पुरुष उमेदवारांची छाती किमान ७७ सेमी असावी आणि ती ५ सेमी फुगवता येणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांसाठी छातीची कोणतीही किमान मर्यादा नाही, परंतु ती ५ सेमी फुगवता येणे आवश्यक आहे.

तरी इच्छुक उमेदवार भारतीय वायुसेनेच्या iafrecruitment.edcil.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Web Title: Indian air force recruitment notification out eligibility criteria apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • Agnipath Bharti Yojana
  • Agniveer Scheme
  • air force
  • Government Job

संबंधित बातम्या

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!
1

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू
2

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू
3

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा
4

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.