crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
भारतीय सैन्यात प्रवेश घेण्याच्या ईच्छुकांसाठी सुर्वणसंधी समोर आली आहे. १०+२ तांत्रिक प्रवेश योजना (TES-55) अभ्यासक्रमासाठी अर्ज प्रक्रिया (जुलै २०२६) लवकरच सुरु होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार कसे आणि कुठे अर्ज करणार? चला जाणून घेऊ या.
School Holidays : सलग पाच दिवस शाळा राहणार बंद, जाणून घ्या कधी अन् किती दिवस असतील सुट्ट्या
शेवटची तारिक काय ?
भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईट www.joinindianarmy.nic.in इथे अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू होणार आहे. आणि शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०२५ अशी असेल.
पात्रता काय?
आर्मी टीईएस ५५ वी भरती २०२५ साठी, १२ वी उत्तीर्ण उमेदवारांनी जेईई मेन्स २०२५ ही परीक्षा दिली असावी. म्हणजेच हजेरी लावलेली असावी. याव्यतिरिक्त, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणितात किमान ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.साधारणपणे,16½ ते 19½ वर्षे वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. जन्मतारीखांची अचूक घोषणा नंतर केली जाईल.
कसे कराल अर्ज?
रिक्त पदांबाबत सर्व नवीनतम माहिती, अपडेट्स किंवा अधिक तपशीलांसाठी, तुम्ही joinindianarmy.nic.in किंवा भारतीय सैन्याच्या भरती पोर्टलला भेट देऊ शकता. १४ ऑक्टोबर पासून अर्ज प्रक्रिया घेण्यात येणार आहे. दरम्यान, रिक्त पदांची संख्या देखील उघड केली जाईल.
सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेडकडून मोठी घोषणा, मेरिटवर होणार निवड
देशभरातील लाखो विद्यार्थी दरवर्षी नोकरीच्या शोधत असतात. तुमच जर पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल नाही. तरी तुम्हाला चिंता करायच गरज नाही. कारण तुमच १० वी आणि १२ किवा इतर विषयात डिप्लोमा आणि आयटी आय झाला असेल तर तुम्हाला नोकरीसाठी अप्लाय करता येईल. सीसीएलने अधिकृत नोटिफिकेशन जारी केल आहे . ज्यात तुम्हाला आता काम करण्याची संधी मिळू शकते.
या सीसीएलमध्ये ११८०पदांवर जागा निघाल्या आहेत. ज्यामध्ये तुम्हाला अप्रेंटिस करता येईल .३ ऑक्टोबर २०२५ अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे .२४ ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे .centralcoalfeilds.in या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येईल .यामध्ये फ्रेशर अप्रेंटिस ६२ पदे, ग्रॅज्युएट अप्रेंटिस २०८ पदे, टेक्निशियन अप्रेंटिस ३८० पदे या पदांवर भरती होणार आहे. ज्या विद्यार्थ्याच वय १८ वर्ष आणि ३२ वर्षापर्यंत यासाठी अप्लाई करता येणार आहे. ७ हजार ते ९ हजारापर्यंत मिळणार स्टायपेंड तर तीन टप्प्यात याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल