Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एमबीएसाठी १. ८० लाख परीक्षार्थी! अर्जातील दुरुस्तीसाठी २८ फेब्रु. ते २ मार्चदरम्यान सुविधा

एमबीए / एमएमएस प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) कडून 2026-27 साठीची नोंदणी प्रक्रिया 25 फेब्रुवारीला संपली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 01, 2026 | 04:42 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

एमबीए / एमएमएस प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) तर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी घेण्यात येणाऱ्या MBA/MMS प्रवेश प्रक्रियेची नोंदणी 25 फेब्रुवारी 2026 रोजी संपली आहे. यंदा या परीक्षेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून एकूण 1 लाख 80 हजार 792 उमेदवारांनी अंतिम नोंदणी केली आहे.

बारावीच्या परीक्षेनंतर काय? सुट्टीत करा ‘हे’ महत्वाचे कोर्स, भविष्यात होईल फायदा

अधिकृत आकडेवारीनुसार, पहिल्या संधीसाठी 1 लाख 32 हजार 798 विद्यार्थ्यांनी अर्ज केला, तर दुसऱ्या संधीसाठी 47 हजार 994 विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. या दोन संधींमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अधिक लवचिकता मिळाली आहे. अर्ज भरताना झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी CET Cell कडून विशेष ऑनलाइन सुविधा सुरू करण्यात आली असून ती 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2026 या कालावधीत उपलब्ध असेल.

MBA/MMS प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया 10 जानेवारी 2026 पासून सुरू झाली होती. सुरुवातीला अर्जाची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती. मात्र विद्यार्थ्यांची वाढती मागणी लक्षात घेता ही मुदत दोन वेळा वाढवण्यात आली. पहिली मुदतवाढ 20 फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली, तर अंतिम मुदत 25 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी मिळाली. परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, पहिल्या टप्प्यातील CET परीक्षा 6 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 9 मे 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.

CAPF असिस्टंट कमांडंट परीक्षा 2026 ची अधिसूचना जाहीर! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज; पदवीधर असणे आवश्यक

दरम्यान, अर्जामध्ये नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती किंवा इतर तपशीलांमध्ये काही चुका राहिल्यास त्या निश्चित कालावधीत दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास प्रवेश प्रक्रियेदरम्यान अडचणी निर्माण होऊ शकतात किंवा अर्ज रद्द होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज सबमिट करण्यापूर्वी तसेच दुरुस्तीच्या कालावधीत सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, असे आवाहन CET Cell कडून करण्यात आले आहे.

Web Title: 180 lakh candidates for mba facility for correction in application form from 28 feb to 2 march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Career
  • MBBS

संबंधित बातम्या

सिंधुदुर्ग जिल्हा बँक लिपिक भरती परीक्षा केंद्रांबाबत अधिकृत खुलासा, परीक्षेसाठी ‘हे’ आहे नवे गणित
1

सिंधुदुर्ग जिल्हा बँक लिपिक भरती परीक्षा केंद्रांबाबत अधिकृत खुलासा, परीक्षेसाठी ‘हे’ आहे नवे गणित

लोक सेवा आयोगात कॉम्प्युटर सायन्सच्या पदांसाठी भरती! एकूण 1672 जागा रिक्त
2

लोक सेवा आयोगात कॉम्प्युटर सायन्सच्या पदांसाठी भरती! एकूण 1672 जागा रिक्त

MHT CET 2026: ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ; आता काय असणार नवीन तारीख?
3

MHT CET 2026: ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ; आता काय असणार नवीन तारीख?

Success Story:घर-संसार सांभाळून ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; आता बनली क्लास-वन अधिकारी
4

Success Story:घर-संसार सांभाळून ४० व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा; आता बनली क्लास-वन अधिकारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.