
फोटो सौजन्य - Social Media
खुशबूने आर्थिक स्वावलंबनासाठी एकटीने मुंबई गाठली आणि नोकरीसोबतच पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न जपले. पोलीस गणवेश परिधान करून आपल्या गावात परतायचे आणि समाजासाठी काम करायचे, हे तिचे ध्येय आहे. तिची ही प्रेरणादायी कहाणी स्विगी फूड मार्केटप्लेसचे सीईओ रोहित कपूर यांच्या “Chai Biskoot” मालिकेतून समोर आली.
दिवसभर डिलिव्हरीचे काम करूनही रात्री अभ्यासासाठी वेळ काढणाऱ्या खुशबूच्या चिकाटीचे अनेकांनी कौतुक केले आहे. विशेषतः छोट्या शहरांतील तरुण आणि महिलांसाठी तिचा प्रवास आशेचा किरण ठरत असून, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या बळावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, हा संदेश तिच्या कथेतून मिळतो.
खुशबूची कहाणी केवळ एका डिलिव्हरी पार्टनरची नाही, तर परिस्थितीशी दोन हात करत मोठे ध्येय गाठण्याची आहे. तिच्या संघर्षाने आणि आत्मविश्वासाने अनेकांना प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता आपल्या स्वप्नांसाठी झटण्याची प्रेरणा दिली आहे.