Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Narendra Modi security: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठा बदल; ‘हे’ आयपीएस ऑफिसर सांभाळणार त्यांच्या सुरक्षेची धुरा!

PM Narendra Modi security India: वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमित कुमार यांची 'SPG' मध्ये ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ३१ मार्च २०२७ नंतर ते एसपीजीचे नवे संचालक म्हणून पदभार स्वीकारतील. वाचा सविस्तर माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 01, 2026 | 11:06 AM
pm modi

pm modi

Follow Us
Follow Us:

PM Narendra Modi security India: वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमित कुमार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत. पंतप्रधान आणि इतर काही अतिविशिष्ट व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’मध्ये (SPG) त्यांची ‘ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी’  म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आयपीएस अमित कुमार हे १९९४ च्या बॅचचे बिहार कॅडरचे पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी प्रदीर्घ काळ ‘सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स’मध्ये (CRPF) अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली आहे. ते सीआरपीएफमध्ये स्पेशल डायरेक्टर जनरल (DG) सारख्या वरिष्ठ पदावर कार्यरत राहिले आहेत. त्यांच्याकडे अंतर्गत सुरक्षा, नक्षलविरोधी मोहिमा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) संचालनाचा दांडगा अनुभव आहे.

एसपीजीचे पुढील संचालक (Director) होणार

आयपीएस अमित कुमार हे एसपीजीचे पुढील संचालक होणार आहेत. या दलाचे विद्यमान संचालक आलोक शर्मा यांचा वाढीव कार्यकाळ ३१ मार्च २०२७ रोजी संपणार असून पुढील सुत्रे अमित कुमार यांच्या हाती येतील. आलोक शर्मा हे नोव्हेंबर २०२३ पासून एसपीजी संचालकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

CBSE 12th Supplementary Exam 2026: CBSE बोर्ड १२ वी सप्लीमेंट्री परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! कधीपर्यंत करता येणार अर्ज?

त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल बोलायचे झाल्यास यांनी एम.टेक (M.Tech) पूर्ण केले आहे. एसपीजीमध्ये ‘ओएसडी’ म्हणून झालेली त्यांची नियुक्ती ही त्यांच्या सुरक्षा क्षेत्रातील आणि प्रशासकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

काय आहे एसपीजी (SPG)?

‘एसपीजी’चे पूर्ण नाव ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ (Special Protection Group) असे आहे. ही भारतातील एक विशेष सुरक्षा यंत्रणा असून, देशाचे पंतप्रधान आणि इतर काही अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींच्या (VVIPs) सुरक्षेची जबाबदारी या दलावर असते. या दलाची स्थापना १९८५ मध्ये करण्यात आली होती. सध्याच्या नियमांनुसार, एसपीजी प्रामुख्याने भारताचे विद्यमान पंतप्रधान आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असते.

AI startup founder: वयाच्या १४ व्या वर्षी बुर्ज खलिफावर ऑफिस? कोण आहे भारतीय वंशाचा AI स्टार्टअप फाउंडर जैनम जैन?

एसपीजीमधील नियुक्ती कशी होते?

एसपीजी दलातील अधिकारी आणि जवानांची नियुक्ती ही प्रतिनियुक्तीवर केली जाते. या दलातील जवानांची निवड निमलष्करी दले (Paramilitary Forces) आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) इत्यादींमधून केली जाते. तर, अधिकारी पदांवरील नियुक्ती ही भारतीय पोलीस सेवेतून (IPS) प्रतिनियुक्तीद्वारे केली जाते.

Web Title: Ips amit kumar appointed spg osd pm narendra modi security next spg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Modi government
  • PM Modi news
  • Security Forces

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.